It seems Sanjay Dutt feared ... Sanju's teaser was said at the launch, said Secret | ​या गोष्टीची वाटतेय संजय दत्तला भीती... संजूच्या टीझर लाँचवेळी सांगितले हे सिक्रेट

गेल्या अनेक दिवसांपासून संजय दत्तचे फॅन्स त्याच्या बायोपिकच्या टीझर आणि पोस्टर लाँच कधी होतेय याची वाट मोठ्या आतुरतेने बघत होते. नुकतेच 'संजू'चे पहिले पोस्टर आणि टीझरदेखील रिलीज करण्यात आले. चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना उलगडण्यात येणार आहेत. पोस्टरमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या पाच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतो आहे. पोस्टर पाहताच तुमच्या लक्षात येईल की पहिल्या फोटोत संजय दत्तचे इंडस्ट्रतील सुरुवातीचे दिवस दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटात 'मुन्ना भाई एमबीबीएस’चित्रपटाचा देखील विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. याला कारण ही तसेच आहे. हा चित्रपट संजय दत्तच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरला होता. या चित्रपटाने रसिकांची पसंती तर मिळवलीच तर होतीच मात्र संजय दत्तची इमेज बदलण्यास मदत केली. त्यामुळे संजयच्या आयुष्यात या चित्रपटाला खूप महत्त्व आहे.
संजय आणि मुन्नाभाई सिरिजचे खूप जवळचे नाते आहे. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या बाबतीत त्याला एक भीती वाटत असल्याचे त्याने संजूच्या टीझर लाँचच्या वेळी सांगितले. संजूच्या भीतीविषयी संजू सांगतो, या चित्रपटात रणबीरने अतिशय चांगल्याप्रकारे माझी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो मुन्नाभाई या व्यक्तिरेखेत देखील दिसणार आहे. त्याने या सगळ्या व्यक्तिरेखा एवढ्या चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत की, मुन्नाभाईच्या पुढील भागात माझ्याऐवजी त्याची तर वर्णी लागणार नाही ना... या गोष्टीची भीती आता मला वाटायला लागली आहे. 
संजूची भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. चित्रपट विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करत आहेत. त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अॅपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल. 

Also Read : हुबेहुब संजय दत्तप्रमाणे दिसतोय रणबीर कपूर, पाहा 'संजू'चा मजेदार Teaser
Web Title: It seems Sanjay Dutt feared ... Sanju's teaser was said at the launch, said Secret
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.