Ishaan Khattar rides on the streets of Mumbai | ईशान खट्टरची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल स्वारी
ईशान खट्टरची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल स्वारी

ठळक मुद्देईशान मुंबईच्या रस्त्यावर दिसला सायकल चालवितानाईशानने सायकल स्वारीचा पूर्णपणे आनंद लुटला


धडक फेम अभिनेता ईशान खट्टर फिटनेस फ्रिक असून नेहमी तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो. सोशल मीडियावर त्याचे जिममधील वर्कआऊटचे फोटो व व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तो प्रेरणा देत असतो. त्यात आता ईशान मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसला. 

ईशान मुंबईच्या रस्त्यावर आपल्याच धुंदीत सायकल चालविताना दिसला. तसेच सायकल स्वारीचा पूर्णपणे आनंद लुटताना दिसला. यावेळी ब्लॅक टीशर्ट आणि ग्रे कलरच्या शॉट्समध्ये ईशानचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला. तो बऱ्याचदा स्पोर्टी लूकमध्ये पाहायला मिळतो. ईशानची सायकल स्वारी पाहून त्याचे चाहते खूप खूश झाले आहेत. 

ईशान खट्टरला दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट 'गीथा गोविन्दम'च्या हिंदी रिमेकसाठी विचारण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, 'गीथा गोविन्दम' हा दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट लवकरच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि यात ईशान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साऊथमध्ये बनलेल्या 'गीथा गोविन्दम'मध्ये मुख्य भूमिका विजय देवरकोंडाने केली होती व या चित्रपटाचे दिग्दर्शन परशुरामने केले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा हिंदीत बनणार असून या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे. या चित्रपटात ईशानसोबत कोण अभिनेत्री असणार हे अद्याप समजू शकलेले नाही. जर ईशानने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला तर त्याला विजयच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.


Web Title: Ishaan Khattar rides on the streets of Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.