Isha Ambani Wedding :अशी रंगली अंबानीच्या लेकीची प्री-वेडिंग रॉयल सेरेमनी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 02:07 PM2018-12-10T14:07:30+5:302018-12-10T14:09:08+5:30

मुकेश अंबानी आपल्या एकुलत्या एका लेकीच्या लग्नात कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. मुकेश अंबानी व नीता अंबानीची मुलगी ईशा अंबानी येत्या १२ डिसेंबरला आनंद परिमलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे यंदाचे सर्वात हायप्रोफाईल लग्न आहे.

Isha Ambani Wedding: Isha Ambani's Pre Wedding sangeet ceremony video | Isha Ambani Wedding :अशी रंगली अंबानीच्या लेकीची प्री-वेडिंग रॉयल सेरेमनी!!

Isha Ambani Wedding :अशी रंगली अंबानीच्या लेकीची प्री-वेडिंग रॉयल सेरेमनी!!

googlenewsNext
ठळक मुद्दे  ईशा आणि आनंद पीरामल यांचे येत्या 12 डिसेंबर रोजी मुंबईत लग्न आहे. ईशा आणि आनंद एकत्र शिकले आहेत. दोघे बालपणापासून एकमेकांना ओळखतात

मुकेश अंबानी आपल्या एकुलत्या एका लेकीच्या लग्नात कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. मुकेश अंबानी व नीता अंबानीची मुलगी ईशा अंबानी येत्या १२ डिसेंबरला आनंद परिमलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे यंदाचे सर्वात हायप्रोफाईल लग्न आहे. इतके की, उदयपूरमध्ये गत शनिवार-रविवार अशा दोन दिवस या लग्नाची संगीत सेरेमनी रंगली. या सेरेमनीचा रॉयल थाट पाहून अनेकांचे डोळे पांढरे झालेत. या प्री-वेडिंग सेरेमनीत देशविदेशातील सुमारे १८०० पाहुणे सहभागी झालेत. बॉलिवूडच्या सर्व दिग्गजांनी या प्री-वेडिंग संगीत सेरेमनीला हजेरी लावली. या प्री-वेडिंग फंक्शनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्री वेडिंग सेरेमनीत सर्वात आधी ‘अन्नसेवा’ विधी पार पडला. यादरम्यान अंबानी कुटुंबाने गरिब व निर्धन लोकांना अन्नदान केले.

गत ८ डिसेंबरला ईशा व आनंद यांच्या लग्नाची संगीत सेरेमनी रंगली. उदयपुरयेथे पीछोला तलावाच्या किना-यावर हॉटेल ओबेराय उदय विलासमध्ये सगतळ्यात आधी श्रीनाथजीची महाआरती केली गेली. या दरम्यान श्रीनाथजी समोर नीता अंबानी मधुराष्टकवर मंत्रमुग्ध होऊन नृत्य केले. स्टेजवर आठ सितारवादक आणि तबला वादक होते. 

यानंतरकिंगखान शाहरूख खान व करण जोहरनेसंगीत सेरेमनी होस्ट केली. या संगीत सेरेमनीत ईशा व आनंद रोमॅन्टिक डान्स करताना दिसले.

अंबानी कुटुंबानेही डान्स केला. केवळ इतकेच नाही तर मुकेश अंबानी व नीता अंबानी हेही बॉलिवूडच्या रोमॅन्टिक गाण्यावर थिरकले.

रविवारी प्री-वेडिंग सेरेमनीत फुलांची होळी खेळली गेली. पाहुण्यांनी एकमेकांवर फुलांचा वर्षाव केला.

रात्री  सहभागी झालेल्या पाहुण्यांसाठी खास कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले.   अमेरिकन पॉप स्टार बियॉन्से या कॉर्निव्हलचे आकर्षण ठरली. या कॉनिर्व्हलमध्ये बियॉन्सेच्या परफॉर्मन्ससाठी अंबानी कुटुंबाने तब्बल १२ कोटी रूपये मोजलेत.

  शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन असे अनेक बडे स्टार या कॉर्निव्हलमध्ये स्टेजवर थिरकले. शाहरूखने गौरीसोबत रोमॅन्टिक डान्स केला तर ऐश्वर्या अभिषेकसोबत रोमॅन्टिक झाली.

ईशाच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंगही पत्नी दीपिकासोबत सहभागी झाला. यावेळी दोघांनीही धम्माल डान्स केला.
  ईशा आणि आनंद पीरामल यांचे येत्या 12 डिसेंबर रोजी मुंबईत लग्न आहे. ईशा आणि आनंद एकत्र शिकले आहेत. दोघे बालपणापासून एकमेकांना ओळखतात. याचवर्षी महाबळेश्वरमध्ये आनंद पीरामले ईशाला लग्नाची मागणी घातली होती. सप्टेंबर महिन्यात इटलीतील लेक कोमो येथे दोघांचा साखरपुडा झाला होता.


 

Web Title: Isha Ambani Wedding: Isha Ambani's Pre Wedding sangeet ceremony video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.