Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या घरी बॉलिवूडच्या अंदाजात वरातीसोबत पोहचले आनंद पिरामल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 06:38 PM2018-12-12T18:38:45+5:302018-12-12T18:38:56+5:30

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आज अानंद पिरामल यांच्यासोबत लग्नबेडीत अडकली आहे.

Isha Ambani Wedding: Anand Piramal with Bollywood's latest era in Isha Ambani's house | Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या घरी बॉलिवूडच्या अंदाजात वरातीसोबत पोहचले आनंद पिरामल

Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या घरी बॉलिवूडच्या अंदाजात वरातीसोबत पोहचले आनंद पिरामल

googlenewsNext

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आज अानंद पिरामल यांच्यासोबत लग्नबेडीत अडकली आहे. हा विवाह सोहळा मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियामध्ये पार पडत आहे. यावेळी आनंद पिरामल वरातीसोबत अँटिलिया येथे पोहचले. वरातीतील मंडळींचे स्वागत खुद्द मुकेश अंबानी यांनी केले. यावेळी वराकडील मंडळींनी बॉलिवूड स्टाईलमध्ये डान्स केला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर लग्नासाठी मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया एखाद्या वधूसारखे सजविले आहे. 

ईशा अंबानीआनंद पिरामल यांच्या विवाह सोहळ्यात जवळपास सहाशे लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे अँटिलियामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

याशिवाय घर फुलांनी सजवण्यात आले आहे. या घराच्या डेकोरेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. ईशाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकेची देखील खूप चर्चा झाली. 


ईशाने आनंद पिरामलसोबत इटलीमध्ये २१ सप्टेंबरला साखरपुडा केला होता. इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या आधीचे विधी नुकतेच पार पडले आणि त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. अनेकांनी तिथे परफॉर्मन्स सादर केला.

त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय एकत्र डान्स करताना दिसले तर दीपिका पादुकोण चिमुकली आराध्या आणि अभिषेकसोबत डान्स करताना दिसली. आता या ग्रँड विवाह सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Isha Ambani Wedding: Anand Piramal with Bollywood's latest era in Isha Ambani's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.