Isha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 02:22 PM2018-12-13T14:22:32+5:302018-12-13T14:27:23+5:30

इशा इंबानीच्या संगीत सेरेमनीतील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोत रणबीर कपूर, आमिर खान, किरण राव, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन दिसत आहेत.

Isha Ambani-Anand Piramal wedding: Ranbir Kapoor, Aishwarya Rai Bachchan, Aamir Khan posed for a blockbuster photo at Isha Ambani’s sangeet | Isha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स

Isha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत असलेल्या सगळ्या कलाकारांनी एखाद्या चित्रपटासाठी एकत्र यावे असे नेटिझन्सने कमेंटद्वारे सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत सगळेच ए स्टार कलाकार पाहायला मिळत आहेत. या सगळ्या कलाकारांना कोणत्या निर्मात्याने चित्रपटासाठी एकत्र आणणे ही अशक्य गोष्ट आहे. पण ही गोष्ट मुकेश अंबानी यांनी जमली आहे असे देखील काही नेटिझन्सने कमेंटमध्ये म्हटले आहेत.

काही दिवसांपूर्वी करण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेला एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोत आपल्याला शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना एकत्र पाहायला मिळाले होते. हा फोटो ब्लॉकबस्टर फोटो असल्याने करणने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

आता या फोटोसोबतच आणखी एक ब्लॉकबस्टर फोटो फोटो लोकांना पाहायला मिळत आहे. हा फोटो इशा अंबानीच्या संगीत सेरेमनीचा असून हा फोटो राजस्थानमधील उदयपूरमधील द ऑबेरॉय उदयविलास येथे काढण्यात आला आहे.

इशा इंबानीच्या संगीत सेरेमनीतील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोत रणबीर कपूर, आमिर खान, किरण राव, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन दिसत आहेत. हा फोटो ब्लॉकबस्टर फोटो असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत असलेल्या सगळ्या कलाकारांनी एखाद्या चित्रपटासाठी एकत्र यावे असे नेटिझन्सने कमेंटद्वारे सांगितले आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत सगळेच ए स्टार कलाकार पाहायला मिळत आहेत. या सगळ्या कलाकारांना कोणत्या निर्मात्याने चित्रपटासाठी एकत्र आणणे ही अशक्य गोष्ट आहे. पण ही गोष्ट मुकेश अंबानी यांनी जमली आहे असे देखील काही नेटिझन्सने कमेंटमध्ये म्हटले आहेत. 

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्याआधीचे विधी नुकतेच पार पडले आहेत. त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तसेच अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी परफॉर्मन्स सादर केला. सलमान देखील एका गाण्यावर थिरकला. 

सलमान स्टेजवर परफॉर्मन्स सादर करत असताना मुकेश अंबानीच्या मुलाने एंट्री केली आणि सलमान मागे झाला आणि तो मागे उभा राहून डान्स करू लागला. यावरूनच सलमान तिथे बॅकराऊंड डान्सर होता असे त्याला नेटिझन्सने हिणवले होते. 

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: Isha Ambani-Anand Piramal wedding: Ranbir Kapoor, Aishwarya Rai Bachchan, Aamir Khan posed for a blockbuster photo at Isha Ambani’s sangeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.