Isha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचे जिओ गार्डनमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 08:36 PM2018-12-14T20:36:41+5:302018-12-14T20:38:12+5:30

ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचा विवाह नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.

Isha Ambani-Anand Piramal wedding: Isha Ambani and Anand Piramal's Grand Reception in the Geo Garden | Isha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचे जिओ गार्डनमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन

Isha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचे जिओ गार्डनमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन

googlenewsNext

ईशा अंबानीआनंद पिरामल यांचा विवाह नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. आज मुंबईतील जिओ गार्डनमध्ये अंबानी कुटुंबाने रिसेप्शनचे आयोजन केले आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधल्या सेलिब्रेटींपासून व्यावसायिक जगतातील दिग्गज व्यक्ती उपस्थिती लावणार आहेत. ईशा व आनंद यांचे रिसेप्शन ग्रॅण्ड बनवण्यासाठी अंबानी कुटुंबियांनी म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन केले आहे. 


देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचाआनंद पिरामलसह शाही थाटात विवाहसोहळा पार पडला. 12 डिसेंबरला या भव्यदिव्य विवाहसोहळ्याचा थाट संपूर्ण जगानं अनुभवला. हे ग्रँड लग्न अंबानींच्या मुंबईतील निवासस्थान अॅन्टीलिया येथे करण्यात आले. या सोहळ्याला मोठ-मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली. नवविवाहीत वधु-वर ईशा-आनंदचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता मुंबईतील जिओ गार्डनमध्ये दुसरे रिसेप्शनचे पार पडणार आहे. त्यासाठी जिओ गार्डन सज्ज झाले आहे.

ईशाचा मुख्य विवाहसोहळा पार पडण्याआधी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे उदयपूरमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडले होते. यावेळी संगीत, मेहंदी असे अनेक कार्यक्रम पार पडले. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी, उद्योजकांसह अनेक मान्यवर हजर राहिले होते. त्यानंतर 12 डिसेंबरला लग्न झाले आणि आता आज रिसेप्शन पार पडत आहे.

Web Title: Isha Ambani-Anand Piramal wedding: Isha Ambani and Anand Piramal's Grand Reception in the Geo Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.