Irfan Khan is trapped in his own trap! Look, Blackmail's trailer! | ​स्वत:च्याच जाळ्यात अडकतो इरफान खान! पाहा, ‘ब्लॅकमेल’चा ट्रेलर!

इरफान खान स्टारर ‘ब्लॅकमेल’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. अशातच आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आमचे मानाल तर हा ट्रेलरही प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा आहे.   ट्रेलरमध्ये इरफान आणि अन्य कलाकार ब्लॅक कॉमेडी करताना दिसताहेत.  ट्रेलरची सुरूवात होते ती, इरफानच्या एन्ट्रीने. या चित्रपटात इरफान देव नामक व्यक्तिरेखा साकारताना दिसतोय.   स्वत:वर बेतलेला प्रसंग मित्राला कहाणी म्हणून ऐकवणारा देव ट्रेलरमध्ये दिसतो. एकदा  सरप्राईज म्हणून देव आॅफिसमधून लवकर घरी परततो. पण पत्नीला प्रियकरासोबत पाहून त्यालाच धक्का बसतो. यास्थितीत त्याला दोन मार्ग सुचतात. एक म्हणजे, पत्नी व तिच्या प्रियकराला ठार मारायचे किंवा दोघांनाही ब्लॅकमेल करायचे. तो ब्लॅकमेल करण्याचा मार्ग निवडतो आणि पत्नीच्या प्रियकराला १ लाख रूपये देण्याचा मॅसेज पाठवतो. पण पुढे होते भलतेच. ट्रेलरमध्ये दिसते त्याप्रमाणे, पुढे इरफान स्वत:च ब्लॅकमेलिंगचा बळी ठरतो. ट्रेलरमध्ये विनोदासोबतच हिंसाचारही बघायला मिळतोय.  

ALSO READ : ...म्हणून इरफान खान शूटिंग अर्धवट सोडून घरी गेला

अडीच मिनिटांचा हा ट्रेलर आपल्या मनावर छाप सोडल्याशिवाय राहत नाही. ट्रेलर बघता, या चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळतील, असे दिसतेय. ट्रेलरमधील हे ट्विस्ट आणि टर्न मनोरंजक आहेत. प्रत्यक्षात पडद्यावर हे ट्विस्ट आणि टर्न पाहताना हा चित्रपट किती मनोरंजक ठरतो, ते बघूच. तूर्तास हा ट्रेलर बघा आणि तो कसा वाटला, ते आम्हाला जरूर कळवा.
‘डेल्ही बेली’ सारखा हिट सिनेमा देणारे दिग्दर्शक अभिनय देव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. इरफानशिवाय दिव्या दत्ता, किर्ती कुल्हारी, अरूणोदय सिंह यात लीड रोलमध्ये आहेत. येत्या ६ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतो आहे.
Web Title: Irfan Khan is trapped in his own trap! Look, Blackmail's trailer!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.