आज संपर्णू जग आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना बॉलिवूड कसे बरे मागे राहील. बॉलिवूडचे अनेक स्टार्स योगाच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवतात. कितीही बिझी लाईफ असले तरी योगाभ्यासासाठी नियमित वेळ काढतात. नियमित योग करणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये सगळ्यांत वरचे नाव अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे आहे. शिल्पाने केवळ स्वत:लाचं योगाभ्यासाद्वारे फिट ठेवलेले नाही तर तिने याप्रती लोकांनाही जागृत केले आहे. शिल्पा शेट्टीपाठोपाठ बिपाशा बासू ही सुद्धा नियमित योग करते आणि याबद्दल समाजात जनजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करते. शिल्पा व बिपाशाशिवाय असे अनेक स्टार्स आहेत, जे नियमित योग करतात. जाणून घेऊ या त्यांच्याविषयी...

शिल्पा शेट्टीशिल्पा शेट्टीला बॉलिवूडचा योगगुरू म्हटले तरी वावगे होणार नाही. शिल्पाने योगगुरू रामदेव बाबा यांच्यासोबतही परफॉर्म  केला आहे. योग हेच शिल्पाच्या फिट असण्याचे रहस्य आहे. त्यामुळेच चाळीशीतही ती फिट आहे.

बिपाशा बासूबिपाशा बासू न चुकता योग करते. गतवर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी योगाभ्यास करतानाचे तिचे व तिचा पती करण सिंग ग्रोव्हरच्या फोटोंनी धमाल केली होती. बिपाशाच्या मते, योग संतुलित आयुष्य जगण्याचा एक मंत्र आहे.

करिना कपूरकरिना कपूरही नियमित योगाभ्यास करते. तैमूरच्या जन्मानंतर नियमित योगाभ्यास आणि कडक डाएट या जोरावर करिना आपल्या शेपमध्ये परतली. ती जिममध्येही जाते. पण तिच्या फिटनेसमागे केवळ जिमचं नाही तर योगाभ्यासाचेही मोठे योगदान आहे.

रेखाबॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा नियमित योगाभ्यास  व ध्यानसाधना करतात. योगाला त्यांच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे़ योगाभ्यास आणि ध्यानसाधनेनेचं त्यांच्या दिवसाची सुरूवात होते. या वयातही रेखांच्या सौंदर्याची चर्चा होते, यामागे हेच कारण आहे.

कंगना राणौतकंगना राणौत हिच्या आयुष्यातही योगाचे मोठे महत्त्व आहे. तिने यासाठी खास योगगुरू ठेवले आहेत. अलीकडे कंगनाने आपल्या या योगगुरूला कोट्यवधीचा फ्लॅट भेट म्हणून दिला होता. माझ्या आयुष्याला योगाभ्यासाने एक शिस्त लावली, असे ती म्हणते.

अनिल कपूरतीन तरूण मुलांचे पिता असलेले अनिल कपूर आजही तितकेच फिट आहेत. जणू त्यांचे वय एकाठिकाणी थांबले आहे. या मिस्टर इंडियाच्या या फिटनेसमागेही योग हेच कारण आहे. अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिच्या मते, नियमित योगाभ्यासामुळेच तिचे वडिल इतके फिट आहेत.
Web Title: International Yoda Day2018: Regular Yoga is the secret of the fitness of these Bollywood stars !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.