सलमान खान आणि आलिया भट्टच्या इन्शाल्लाची घोषणा होताच नेटिझन्सने शेअर केला सलमान आणि आलियाचा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:22 PM2019-03-19T18:22:39+5:302019-03-19T18:23:44+5:30

आलिया भट आणि सलमान खान यांच्यात जवळजवळ ३० वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे या जोडीच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. 

Inshallah: Twitter digs up Salman Khan’s pic with a baby Alia Bhatt as Sanjay Leela Bhansali announces film | सलमान खान आणि आलिया भट्टच्या इन्शाल्लाची घोषणा होताच नेटिझन्सने शेअर केला सलमान आणि आलियाचा हा फोटो

सलमान खान आणि आलिया भट्टच्या इन्शाल्लाची घोषणा होताच नेटिझन्सने शेअर केला सलमान आणि आलियाचा हा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान आणि आलियाने ट्वीटरद्वारे ही बातमी दिल्यानंतर नेटिझन्सने सलमान आणि आलियाचा लहानपणीचा फोटो पोस्ट करून त्यासोबत छान कॅप्शन टाकले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हे दोघे नायक-नायिका म्हणून एकत्र काम करतील असा कधी कोणी विचार तरी केला असेल का?

संजय लीला भन्साळीच्या ‘इन्शाल्ला’ या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉपमोस्ट अ‍ॅक्ट्रेस आलिया भटसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. सलमाननेच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. त्याने आज सकाळी याबाबत ट्वीट केले आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, संजयसोबत काम करून जवळजवळ २० वर्षं झाली. आता पुन्हा एकदा आम्ही नवीन चित्रपटात एकत्र काम करत आहोत. आलियासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. 



 

सलमानने ट्वीट केल्यानंतर काहीच मिनिटांत आलिया भट्टने देखील या चित्रपटाबाबत ट्वीट केले आहे. तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, खुल्या डोळ्यांनी स्वप्न पाहा आणि मी हे करू शकते, असे म्हणा. संजय सर आणि सलमान एकत्र हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. ‘इन्शाल्ला’मध्ये या दोघांसोबत काम करण्यास मी प्रचंड उत्सुक आहे.



 

आलिया भट आणि सलमान खान यांच्यात जवळजवळ ३० वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे या जोडीच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. 

सलमान आणि आलियाने ट्वीटरद्वारे ही बातमी दिल्यानंतर नेटिझन्सने सलमान आणि आलियाचा लहानपणीचा फोटो पोस्ट करून त्यासोबत छान कॅप्शन टाकले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हे दोघे नायक-नायिका म्हणून एकत्र काम करतील असा कधी कोणी विचार तरी केला असेल का?



 

यासोबतच काहीजणांनी सलमान आणि संजय यांचे हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेचे फोटो पोस्ट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. संजय लीला भन्साळीने रणवीर सिंगसोबत पद्मावत, बाजीराव मस्तानी यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता सलमान खान आणि संजय एकत्र येऊन काय करणार याची कल्पना करून तरी पाहा असे या फोटोसोबत कॅप्शन देखील देण्यात आले आहे.



 

सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी हम दिल दे चुके सनम सारखा हिट चित्रपट बॉलिवूडला दिला आहे. या चित्रपटात सलमानसोबतच अजय देवगण आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते. 

Web Title: Inshallah: Twitter digs up Salman Khan’s pic with a baby Alia Bhatt as Sanjay Leela Bhansali announces film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.