बॉलिवूडमध्ये अभिनेता इंदर कुमारला सर्वाधिक कोणी सपोर्ट केला असेल तर तो सलमान खान आहे. वास्तविक इंदरचे सलमान खानसोबतचे नाते सख्ख्या भावासारखे राहिले आहे. बॉलिवूडमध्ये ‘मासूम’पणे पाऊल ठेवणाºया इंदरला सलमान व त्याच्या परिवाराने खूप मदत केली. कारण इंदरच्या फिल्मी करिअरकडे बघितल्यास, सलमान खानसोबत त्याने केलेले चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट राहिले आहेत. ‘तुमको न भूल पायेंगे’ आणि ‘वॉन्टेड’ या चित्रपटांनी इंदरच्या करिअरलाही सावरले. 

इंदर कुमारने त्याच्या करिअरमध्ये जवळपास २० चित्रपट केले. यातील बहुतांश चित्रपटांमध्ये त्याला ‘ए’ लिस्ट सुपरस्टार्ससोबत काम करावे लागले. कारण काही चित्रपटांमध्ये तो मुख्य अभिनेत्याच्या भावाच्या भूमिकेत झळकला तर काही चित्रपटांमध्ये त्याला मुख्य अभिनेत्याच्या विरोधात म्हणजेच खलनायकाची भूमिका साकारावी लागली; मात्र त्याने सलमानसोबत केलेल्या चित्रपटांची तºहा काही वेगळीच म्हणावी लागेल. त्यामुळेच कदाचित सलमान आणि इंदरला इंडस्ट्रीमध्ये सख्ख्या भावासारखे ओळखले जाते. बातमीत दिलेले फोटो बघून तुमच्याही ही बाब कदाचित लक्षात येईल. 

दरम्यान, इंदरने नुकतेच दोन चित्रपटांचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे आगामी दोन चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे. परंतु दुर्दैवाने या चित्रपटांचे यश बघायला तो नसेल. त्याचबरोबर सलमानसोबत इंदरचे नाते खूपच चांगले राहिले आहे. शिवाय सलमान त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ची शूटिंग पूर्ण करून नुकताच मोरोक्को येथून मुंबईत परतला आहे. त्यामुळे सलमान इंदरच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. 
Web Title: Inder Kumar's relationship with Salman Khan was like a brother; These five photos are proof!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.