I'm not happy with Patan's career: Boyfriend Tiger Shroff, Dishney Tiger's desire to work | दिशा पटानीच्या करिअरवर खूष नाही बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ, दिशाने 'हे' काम करावे टायगरची इच्छा

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मात्र अजूनपर्यंत दोघांनी आपलं नातं कधीच स्वीकारले नाही. तरीही बी-टाऊनमध्ये दोघांच्या अफेअरची चर्चा नेहमीच असते. काही दिवसांपूर्वी दोघे एकत्र व्हेकेशनवर गेले होते याचा खुलासा त्यांचे सोशल मीडियावरील फोटोवरुन बांधण्यात आला. नुकतेच दोघे बागी2 मध्ये एकत्र दिसले होते.   

दिशा पटानीने नुकताच सलमान खानचा भारत चित्रपट साईन केला आहे. यात ती सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे. याशिवाय दिशा अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा दिसते आहे. मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ तिला करिअरबाबत सुद्धा सल्ला देत असतो कारण दिशाच्या चॉईसला घेऊन टायगर फारसा खुश नाही आहे.    

डीेएनएच्या रिपोर्टनुसार, टायगरचे म्हणणे आहे की, ''दिशाने सिनेमापेक्षा जाहिरातींवर लक्षकेंद्रीत करावे. दिशाच्या करिअरचा प्रवास फारसा योग्य दिशेने चालला आहे असा वाटत नाही.''        

ALSO READ :  दिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

टायगर आणि दिशाच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाले तर सध्या टायगर त्याचा आगामी चित्रपट 'स्टुडेंट ऑफ द इअर2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात टायगरच्या अपोझिट तारा सुतारिया आणि अनन्या पांडे डेब्यू करतायेत. पुनीत मल्होत्रा हा चित्रपट दिग्दर्शित करतोय. या चित्रपटाचे शूटिंगदेहरादून, मसूरी आणि ऋषीकेश येथे होणार आहे. त्यानंतर पुण्याच्या एका कॉलेजमध्ये चित्रपटाची शूटिंग होणार आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ या चित्रपटाचा सीक्वल आहे.या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काम केले होते. या तिघांनी या चित्रपटाच्या माध्यमातूनच आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 

Web Title: I'm not happy with Patan's career: Boyfriend Tiger Shroff, Dishney Tiger's desire to work
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.