Ilyana Dikruja gets screaming in the South Industry Know, why? | ​साऊथ इंडस्ट्रीतील ‘तो’ पहिला सीन आठवताच इलियाना डिक्रूजला येतो संताप! जाणून घ्या, का?

बॉलिवूडमध्ये दशकभर काळ घालवल्यानंतर इलियाना डिक्रूज हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. साऊथच्या या ‘ब्युटी’ने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच इलियाना अजय देवगणसोबत ‘रेड’ या चित्रपटात दिसणार आहे. तेलगु इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरूवात करणा-या इलियानाने अलीकडे एका मुलाखतीत सुरूवातीच्या दिवसांच्या अनेक आठवणी शेअर केल्यात. यादरम्यान तिने साऊथ इंडस्ट्रीबद्दल अनेक खळबळजनक खुलासेही केलेत. साऊथ फिल्ममेकर्सला अभिनेत्रीच्या अभिनयात नाही तर पडद्यावर तिचा कमनीय देह दाखवण्यात अधिक रस असतो, असे इलियाना यावेळी म्हणाली. याबद्दलचा एक किस्साही तिने शेअर केला. साऊथमध्ये मी आले तेव्हा काय होतेयं, हेच मला कळायचे नाही. मला आजही माझा पहिला सीन आठवतो. पहिल्या सीनमध्ये माझ्या कमरेवर एक मोठे नारळ येऊन पडते, असे स्लो मोशनमध्ये दाखवले गेले. या सीनची गरज काय, असाच प्रश्न मला त्यावेळी पडला. मी दिग्दर्शकाला विचारले तेव्हा, त्याने दिलेले उत्तर ऐकून मी बेशुद्धच पडायची बाकी उरले. तुझी कंबर खूप आकर्षक आहे. ती कुणालाही वेड लावेल, हा सीन हिट होईल, असे त्या दिग्दर्शकाने मला निर्लज्जपणे सांगितले. तो सीन मी कसाबसा पूर्ण केला. पुढेही साऊथमध्ये माझ्या कमरेवर असे अनेक सीन्स केले गेलेत.  ते सीन देतानाची माझी स्थिती काय होती, ते माझे मलाच माहित. केवळ आणि केवळ पैशांसाठी मी असे सीन्स दिलेत. पण करिअरमधला सातवा सिनेमा करताना मात्र आता हे बस्स झाले, असे मला वाटले आणि पुढे मी अशा सीन्सला ठाम नकार द्यायला शिकले. यानंतरच मी बॉलिवूडकडे वळले, असे इलियानाने सांगितले.

ALSO READ : ​‘सिंघम’ बनला इनकम टॅक्स आॅफिसर! पाहा, ‘रेड’चा दमदार ट्रेलर!!

‘रेड’ हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. १९८१ मधील देशातील सर्वात मोठा हायप्रोफाईल आयकर धाडीचे कनेक्शन यात दाखवले आहे.या चित्रपटात अजय पुन्हा एकदा इलियाना डिक्रूजसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यापूर्वी ‘बादशाहो’मध्ये ती अजयसोबत दिसली होती.
Web Title: Ilyana Dikruja gets screaming in the South Industry Know, why?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.