Ileana's 'twin' denied! | इलियानाचा ‘जुडवा २’ला नकार !

 बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डीक्रुझ तिच्या हॉट अदांनी रसिकांना घायाळ करत असते. तिची ‘मैं तेरा हिरो’ मधील वरूण धवनसोबतची केमिस्ट्री चाहत्यांना बेहद आवडते. पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल ना? ‘जुडवा २’ च्या निमित्ताने हे पुन्हा एकत्र दिसतील, अशी चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे.

मात्र, इलियानाने या गोष्टीला साफ नकार दिलाय म्हण. १९९७च्या ‘जुडवा’ चित्रपटाचा ‘जुडवा २’ हा सिक्वेल असून यात परिणीती चोप्राला घेण्यात आल्याचे कळते आहे. इलियानाला जेव्हा ‘ तू ‘जुडवा २’ साठी तू दिग्दर्शकांना जाऊन भेटलीस का? असे विचारण्यात आले.

तेव्हा तिने या गोष्टीला नापसंती दर्शवली. ‘जुडवा २’ मध्ये तिला काम करायला आवडेल आणि  तिचे ‘बादशाहो’ आणि ‘मुबारकाँ’ चित्रपटांकडे लक्ष लागून राहिले असल्याचे ती सांगते. 
Web Title: Ileana's 'twin' denied!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.