IIFA 2017: Manish Paul and Riteish Deshmukh play the role | IIFA 2017:मनीष पॉल आणि रितेश देशमुखने या अभिनेत्याला केले टार्गेट

पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटी मंडळींसोबत सा-यांच्या नजरा आकर्षित करुन घेतात ते पुरस्कार सोहळ्याचे होस्ट. आपलं सूत्रसंचालन, हजरजबाबीपणा आणि आकर्षक पद्धतीच्या सादरीकरणाने ते उपस्थितांचं मनोरंजन करतात. त्यामुळे कोणत्याही पुरस्कार सोहळ्याचे होस्ट हे त्याचं अविभाज्य घटक असतात. अठराव्या आयफा पुरस्कार सोहळ्यातही होस्टची धम्माल मस्ती पाहायला मिळाली. सलमान खान आणि व्यंकटेश प्रसाद हे या सोहळ्याला उपस्थित राहणा-या पहिल्या पाहुण्यांपैकी एक होते. मात्र यानंतर सोहळ्याची सगळी सूत्रं हाती घेतली ती या सोहळ्याच्या सूत्रसंचालकांनी. या सोहळ्याचे होस्ट मनीष पॉल आणि रितेश देशमुख यांनी आपल्या सूत्रसंचालनाच्या स्टाईलनं उपस्थितांची मनं जिंकली. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित भरभरुन दाद देत असल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीलाच त्यांनी दंगल सिनेमा आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचं अनोख्या पद्धतीनं सादरीकरण करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. आमिर खानसारखी हुबेहूब अंदाज सादर करत त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. आमिर खान 'दंगल' सिनेमाच्या प्रमोशनसाठी चीनला गेल्यापासून चायनीज दिसत असल्याचे त्यांनी सांगताच एकच हंशा पिकला. यानंतर कमाल खाननं दबंग सलमान खानच्या गाजलेल्या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. यावेळी त्याच्या सूरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. कमाल खान गात असताना सलमानही ती गाणी गुणगुणत असल्याचं पाहायला मिळाले. हे पाहून उपस्थित रसिकांमध्येही जोश चढला आणि ते कमाल खानला चिअर करु लागले. यानंतर दलजीतसिंग दोसांज यानंही एकाहून एक सुपरहिट गाणी सादर करुन रसिकांचं मनोरंजन केलं. याशिवाय सोहळ्यात रितेश आणि मनीषची धम्माल सुरुच होती. पाच पैशाचा विनोद आणि हिंदीचे धडे देत सादर करत या दोघांनी उपस्थितांनी हसून हसून लोटपोट केलं. याशिवाय शाहिद कपूर, अनुपम खेर, कॅटरिना कैफ यांनाही टॉयलेट एक प्रेमकथाचा धागा पकडत हिंदीचे धडे देण्याचा प्रयत्न केला आणि रसिकांचं धम्माल मनोरंजन केलं. 
Web Title: IIFA 2017: Manish Paul and Riteish Deshmukh play the role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.