IIFA 2017: Know this role for Nawazuddin Siddiqui, a big challenge | IIFA 2017: जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी या भूमिका होत्या मोठे आव्हान

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं एकाहून एक सरस भूमिकांनी रसिकांचे तुफान मनोरंजन केले आहे. त्यामुळे सध्या नवाजुद्दीन जिथे जातो तिथे त्याच्या सिनेमांविषयी चर्चा नाही झाली तरच नवल. यंदा 18 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात दुस-यांदा नवाजुद्दीनने हजेरी लावली. आपल्या खास अंदाजात आयफामध्येही त्याने आपली छाप पाडल्याचे पाहायला मिळाले. आयफाच्या निमित्ताने मीडियासह चर्चा करताना  त्याला आजपर्यत सगळ्यात कठीण वाटत असेलले काम यशस्वी केल्याचे आनंद व्यक्त केला. होय, नवाजुद्दीनला आजपर्यत अशक्य वाटणारी गोष्ट खुद्द टायगर श्रॉफच्या मदतीने शक्य करुन दाखवली आहे. मुन्ना मायकल सिनेमात नवाजुद्दीनला टायगर श्रॉफसह डान्स  करणे हे कधीही न जमलेले काम आहे. त्यामुळे टायगरसाठी आपल्याला थिरकवणे हा मोठा टास्क असल्याचे नवाजुद्दीनने सांगितले.सिनेमा सोडा,मी माझ्या आयुष्यात कधीही डान्स केला नाही असं नवाजुद्दीननं म्हटलं आहे. डान्स करणे हे माझ्यासाठी मोठं आव्हान होते. सध्या नवाजुद्दीन हटके भूमिका साकारत असलेला 'बाबूमोशाय बंदूकबाज' आणि 'मंटो' हे दोन सिनेमाही खूप चर्चेत आहेत.नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘बाबुमोशाय’ अंदाज पाहण्यासाठी रसिक उत्सुक आहेत. या सिनेमातही त्याने  प्रथमच लिपलॉक सीन्स आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. कलाकारंना ब-याच आव्हानांना सामोरं जावे लागते. त्यातले मुन्ना मायकल आणि बाबूमोशाय हे दोन मोठे आव्हान माझ्या समोर होते. या सगळ्यांवर मला जास्त मेहनत करावी लागली असल्याचे नवाजुद्दीनने सांगितले. तसेच पाकिस्तानी लेखक सादत अली हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित त्याचा 'मंटो' हा बायोपिक यावर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मंटो यांची भूमिका साकारणार आहे.ऑनस्क्रीनही या भूमिकेला न्याय मिळून देणार असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. याविषयी नवाजुद्दीनने  सांगितले की,मंटो यांच्या जीवनाविषयी फारशी संग्रहित अशी माहिती उपलब्ध नाही.मला विविध साहित्यिकांचं साहित्य, जुन्या कथा वाचायला फार आवडतात. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी लागणारी सर्व मेहनत मी केली आहे. जवळपास दोन ते तीन महिने मंटो या सिनेमासाठी तयारी मी केली आहे. मंटो यांची विविध पुस्तके मी वाचली आहेत.मंटो सिनेमाची कथा आजच्या काळाला अनुरुप अशीच आहे. त्यामुळे हा सिनेमाही रसिकांना आवडेल अशी खात्री वाटत असल्याचे त्याने आयफा पुरस्कार सोहळ्यात सांगितले.
Web Title: IIFA 2017: Know this role for Nawazuddin Siddiqui, a big challenge
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.