If you knew about the death of Sridevi, Jhanvi Kapoor fell unconscious! | मॉम श्रीदेवीच्या निधनाची बातमी कळताच जान्हवी कपूर पडली बेशूद्ध!

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. दुबईला श्रीदेवी पती बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशी यांच्यासोबत पुतण्याच्या लग्नात गेल्या होत्या. या लग्न समारंभात त्यांची मोठी मुलगी जान्हवी सहभागी झाली नव्हती. त्यामुळे जान्हवी सध्या मुंबईतच आहे. दरम्यान जान्हवीला जेव्हा मॉम श्रीदेवीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा तिची अवस्था खूपच बिकट झाली होती. 

ऐकीकडे मोहित मारवाहच्या लग्नसमारंभात संपूर्ण कपूर खानदान दुबईमध्ये सेलिब्रेशन करीत होते, तर दुसरीकडे जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘धडक’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती. शूटिंगमुळेच ती या समारंभात सहभागी होऊ शकली नाही. वृत्तानुसार, जेव्हा जान्हवीला मॉम श्रीदेवीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा ती मुंबईतच होती. निर्माता करण जोहरने लगेचच जान्हवीचे घर गाठत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिला ही बातमी समजली तेव्हा ती बेशुद्ध झाली. रडून-रडून तिची अवस्था बिकट झाली आहे. जान्हवीची ही अवस्था बघून करण तिला काका अनिल कपूरकडे घेऊन गेला. 

सुत्रानुसार, जान्हवी अजुनही अनिल कपूरच्या घरी आहे. रात्री उशिरापर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. श्रीदेवीच्या अंतिम दर्शनासाठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही गर्दी केली आहे. 
Web Title: If you knew about the death of Sridevi, Jhanvi Kapoor fell unconscious!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.