If you do not have Ely Infinite, then you are making a date with 'this' actress Hardik Pandya | एली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या

बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन सतत चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. मात्र आता हार्दिक पांड्याचे नाव आणखीन एका अभिनेत्रीशी जोडण्यात आले आहे. मुंबई इंडियंसमधून आयपीएल खेळणारा हार्दिक पांड्या एलीला नाही तर बॉलिवूडमधील दुसऱ्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे.   तुम्ही विचार करत असाल एली नाही तर ही अभिनेत्री आहे तरी कोण जिच्यासाठी हार्दिकचे ह्रदय धडकते आहे. मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक उर्वशी रौतेलाला डेट करतो आहे. एका वेबपोर्टलच्या रिपोर्टनुसार, हार्दिक आणि उर्वशी मुंबईत क्वालिटी टाईम स्पेंट करताना दिसले.  दोघे मुंबईत गौतम सिंघानिया यांच्या पार्टीत एकत्र पोहोचले आणि तिकडे हार्दिक उर्वशीसोबत फ्लर्ट करताना दिसला. या पार्टीत उपस्थित लोकांनी त्यांच्यामध्ये एक खूप चांगली केमिस्ट्री बघितल्याचे कळतेय.

नुकतीच उर्वशी 'हेट स्टोरी 4'मध्ये दिसली होती.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता, मात्र त्यातील काही सीन्सची चांगलीच चर्चा झाली होती. ‘हेट स्टोरी-४’मध्ये उर्वशी व्यतिरिक्त करण वाही, विवान भटेना, इहाना ढिल्लो आणि गुलशन ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला टी-सिरीजने प्रोड्यूस केले आहे. 
तसे ही बॉलिवूड आणि क्रिकेटचे नातं खूप जूने आहे. हार्दिकचे नाव एलीच्या आधी परिणीती चोप्रासोबत सुद्धा जोडण्यात आले होते. परिणीतीने Twitter अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केली होती. या फोटोवर क्रिकेटपटू हार्दिक पंड्या बोलला अन् मग परिणीती व हार्दिकच्या ‘लव्ह स्टोरी’च्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर हार्दिकच्या भावाच्या लग्नात एली अवराम सहभागी झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा काही महिने रंगल्या होत्या. त्यानंतर आता हार्दिकचे नाव उर्वशीसोबत जोडण्यात येते आहे आता यात किती तथ्य आहे हे हार्दिक आणि उर्वशीलाच माहिती. 
Web Title: If you do not have Ely Infinite, then you are making a date with 'this' actress Hardik Pandya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.