If Kajol's daughter does not act, then just do something ... read what! | ​ काजोलच्या मुलीला अ‍ॅक्टिंग नाही तर भलतेच काही करायचेयं...वाचा काय!

सध्या बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांचीच अधिक चर्चा  होताना दिसतेय. स्टार किड्स कुठे जातात, काय करतात, त्यांना काय करायचेयं इथपासून तर त्यांची फॅशन, स्टाईन अन् मित्र-मैत्रिणींपर्यंत अशा सगळ्यांचीच अलीकडे बातमी होताना दिसते. अनेक स्टारकिड्सनी गेल्या काही वर्षांत करिअर आॅप्शन म्हणून अ‍ॅक्टिंगची निवड केली. यापैकी काही फ्लॉप झालेत तर काही स्टार. वरूण धवन, अर्जुन कपूर, सोनम कपूर, रणबीर कपूर, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, शाहिद कपूर, सोनाक्ष्ी सिन्हा हे स्टारकिड्स यशस्वी झालेत तर अनेक जण फ्लॉप. स्टारकिड्सची आणखी एक नवी पिढी बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, अमृता सिंह व सैफ अली खानची लेक सारा अली खान आदींची नावे आहेत. यापलीकडे आणखी काही स्टार किड्स बॉलिवूडमध्ये येणार म्हणून चर्चा आहे. यात शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम, अक्षय कुमारचा मुलगा आरव अशा अनेकांची नावे रांगेत आहेत. पण काही स्टारकिड्स आहेत, ज्यांना अ‍ॅक्टींगमध्ये नाही तर भलत्याच गोष्टीत रूची आहे. होय, आम्ही बोलतोय ते अजय देवगण व काजोलची मुलगी न्यासा हिच्याबद्दल.

न्यासाला अभिनयात अजिबात रस नाही. त्यामुळेच डॅड आणि मॉमसारखा तिला अभिनय करायचा नाही. तिचा काही वेगळाच प्लान आहे. होय, न्यासाला एक जगप्रसिद्ध शेफ बनायचे आहे. काजोलनेही अलीकडे एका मुलाखतीत ही कबुली दिली होती. न्यासाला कुकिंगची प्रचंड आवड आहे. ती खूप मस्त ब्राऊनीज बनवते. घरी वेळ मिळतो, तेव्हा तेव्हा ती वेगवेगळ्या डिश बनवत असते, असे काजोल म्हणाली होती.  न्यासाची मॉम काजोलने १६ वर्षीच चित्रपटांत काम करणे सुरु केले होते. न्यासा सध्या १५ वर्षांची आहे. एकंदर काय तर, आईप्रमाणेच लेकीचाही करिअर प्लान पक्का झाला आहे. तेव्हा तिला शुभेच्छा देऊ यात!
Web Title: If Kajol's daughter does not act, then just do something ... read what!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.