If Ileana decouce is not pregnant? | ​इलियाना डिक्रूज प्रेग्नंट तर नाही?

अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिचे चाहते आपल्या या आवडत्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्याच कायम उत्सूक असतात. पण आपले खासगी आयुष्य मीडियापासून दूर ठेवण्यात इलियानाचा हातखंडा आहे. आधी इलियानने आपल्या बॉयफ्रेन्डला मीडियापासून लपवले. मग लग्नाची बातमीही लपवली. या सगळ्या बातम्यांचा खुलासा करण्यासाठी मीडियाला बरेच काही करावे लागले. आता इलियाना आणखी एक बातमी लपवू पाहते आहे. 
होय, मुंबई मिररमध्ये प्रकाशित बातमीनुसार, इलियाना लवकरच आई बनणार आहे. पती अँड्यू नीबोनसोबत इलियाना आपल्या पहिल्या बाळाची आतुरतेने प्रतीक्षा करतेय. अलीकडे इलियाना मुंबई विमानतळावर दिसली. पण यावेळी पूर्णवेळ तिची बेबी बंप लपवण्याची धडपड सुरू होती.प्रेग्नंसी लपवण्याच्या नादात इलियानाचा ड्रेसिंग सेन्सही बदललेला दिसतो आहे. खरे तर इलियाना तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशनेबल आऊटफिट्ससाठी ओळखली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून ती ढगळ आणि लांबलचक कपड्यांमध्ये दिसतेय. इलियाना प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांना हवा देणारी आणखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे, तिच्या पतीची ताजी पोस्ट. होय, इलियानाच्या पतीने तिचा एक बाथ टबमधील सुंदर फोटो शेअर केला आहे.ALSO READ : इलियाना डिक्रूजने उरकले गूपचूप लग्न! बॉयफ्रेन्डला म्हटले हबी

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘एकप्रकारे स्वत:सोबतचे काही निवांत क्षण...’असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. या कॅप्शनमधील ‘एकप्रकारे’ हा शब्द इलियाना प्रेग्नंट असण्याकडे इशारा करणारे आहे. या कॅप्शनवरून स्पष्ट आहे की, हा फोटो घेताना पतीशिवाय इलियानासोबत आणखीही कुणी होते. यामाध्यमातून अँड्यूने येणाºया बाळाबद्दलचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.
तूर्तास इलियानाने प्रेग्नंट असल्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. पण ही बातमी खरी असेल तर इलियानाला शुभेच्छा द्यायलाचं हव्यात!
इलियानाचा बॉयफ्रेन्ड अँड्यू एक फोटोग्राफर आहे. आॅस्ट्रेलियात राहणा-या अँड्यूला इलियानाचे फोटो काढणे आवडते. इलियानाचे अनेक फोटो त्याने काढले आहेत. विशेष म्हणजे, इलियानाने यापैकी अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी इलियानाचा बाथटममधील न्यूड फोटो चांगलाच गाजला होता. अँड्यूनेच तिचे हे हॉट फोटोशूट केले होते.

Web Title: If Ileana decouce is not pregnant?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.