I was being teased and the makers were enjoying beer. Zarina Khan's serious charge on 'Often 2' makers !! | ​माझ्यासोबत छेडछाड होत होती अन् मेकर्स बीअरचा आस्वाद घेत होते..! ‘अक्सर2’च्या मेकर्सवर जरीन खानचे गंभीर आरोप!!

अभिनेत्री जरीन खानचा ‘अक्सर2’ गत शुक्रवारी रिलीज झाला. पण अलीकडे या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जरीनसोबत लोकांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अचानक चाळीस ते पन्नास लोकांच्या घोळक्याने   जरीनला घेरले आणि तिच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी त्यांनी धक्काबुक्की सुरु केली. याच गर्दीतील काहींनी जरीनसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे व्यथित जरीन यानंतर लागलीच रात्रीची फ्लाईट पकडून मुंबईला परतली.
या सगळ्या प्रकारावर जरीन बोलली आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील या छेडछाडीच्या घटनेनंतर ‘अक्सर2’च्या निर्मात्यांबद्दलचा तिचा संताप उफाळून आला आहे. वरूण बजाज या चित्रपटाचे निर्माते आहेत. जरीनने वरूण बजाज यांना ‘अनप्रोफेशनल’ ठरवत त्यांच्यावर  अनेक आरोप केले आहेत. एवढेच नव्हे तर ‘अक्सर2’च्या सेटवरचे अनेक संतापजनक अनुभवही तिने शेअर केले आहेत.  ‘अक्सर2’च्या शूटींगदरम्यान सुरुवातीपासून सगळे काही ठीक नव्हते, असे तिने म्हटले आहे. तिने म्हटले की, ‘अक्सर2’ साईन करताना हा एक क्लिन चित्रपट असल्याचे मला सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्ष शूटींग सुरू झाल्यावर सगळेच उलट घडले. प्रत्येक फ्रेममध्ये मला तोकडे कपडे घालण्यास सांगितले गेले, खरे तर अशा कपड्यांची काहीही गरज नव्हती. मला न सांगता आणि काहीही कारण नसताना चित्रपटातील किसींग सीन्स वाढवण्यात आले, हे आणखीच वाईट होते. सेन्शुअस सीन्सही इतक्या मर्यादेपर्यंत शूट केले गेलेत की, त्यांना केवळ ‘वर्ल्गर’चं म्हटल्या जाईल.  दिल्लीत छेडछाड झाली कारण मला कुठलीच सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. माझ्यासोबत छेडछाड होत होती आणि मेकर्स बीअर पिण्यात गुंग होते, असे जरीन म्हणाली.

ALSO READ : Shocking : दिल्लीत जरीन खानसोबत छेडछाड; रात्रीच फ्लाइट पकडून मुंबईत दाखल!

अर्थातच जरीनचे सगळे आरोप निर्मात्यांनी फेटाळून लावलेत. जरीनने कमिटमेंट्स पाळल्या नाहीत. प्रमोशन वेन्यूवर सुरक्षा न मिळाल्याचा तिचा आरोप खोटा आहे. स्पॉन्सरसोबत तिची बाचाबाची झाली आणि नंतर मी इथे एक क्षणभरही थांबणार नाही, असे सांगून ती निघून गेली. यावेळी चार बॉडीगार्ड्ससह तिने वेन्यू सोडला होता. तिचा मॅनेजरही तिच्यासोबत होता. स्पॉन्सरच्या कारमध्ये बसलेली जरीन स्पॉन्सरसोबतच वाद घालू लागली. यामुळे स्पॉन्सरने गाडीची चाबी काढून घेतली. यानंतरही आम्ही जरीनला सुरक्षित हॉटेलपर्यंत सोडले. यानंतरही ती टीमला न सांगता दिल्लीतून निघून गेली, असे मेकर्सने म्हटले आहे.
Web Title: I was being teased and the makers were enjoying beer. Zarina Khan's serious charge on 'Often 2' makers !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.