I have seen malnutrition, eat some food ...! Kareena Kapoor's advice to the users !! | कुपोषित दिसू लागली आहेस, काही तर खात जा...! युजर्सचा करिना कपूरला सल्ला!!

करिना कपूरला स्टाईल आयकॉन म्हणून ओळखले जाते. तिचा फॅशन सेन्सही जबरदस्त आहे. स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी करिना प्रचंड मेहनत घेते. म्हणूनच तिचा अधिकाधिक वेळ जिममध्ये जातो. याचा पुरावा करिनाच्या सोशल अकाऊंटवर तुम्हाला पाहायला मिळू शकतो. करिनाचे सोशल अकाऊंट वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओने भरलेले आहे. एकंदर काय तर करिना तिच्या फिटनेस आणि अंदाजामुळे कायम चर्चेत असते. पण अलीकडे करिनाला याच फिटनेसमुळे ट्रोल व्हावे लागले. होय, अलीकडे फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रासाठी करिना सिंगापूरमध्ये रँप वॉक करताना दिसली. या शोनंतर करिनाने तिची बेस्ट फ्रेन्ड अमृता अरोरासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.या फोटोत करिना बरीच सडपातळ दिसतेय. पण या फोटोमुळे लोकांनी करिनाला चांगलेच ट्रोल केले. अनेक युजर्सनी करिनाला भरपूर खाण्याचा सल्ला दिला. काहींनी तिला प्रोटीन्स घेण्याचे सुचवले. एका युजरने तर करिनाला चक्क कुपोषित ठरवले. करिना, काही तर खात जा, असे एका युजरने लिहिले. तर एका युजरने करिनाचा हा अवतार पाहून, एक वेगळीच शंका उपस्थित केली. सडपातळ दिसण्यासाठी करिनाने कुठली ट्रिटमेंट तर केली नाही ना? असा सवाल त्याने केला.ALSO READ : या मराठी चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसू शकते करिना कपूर खान..जाणून घेण्यासाठी क्लिक करा

आता या चाहत्यांचा सल्ला करिना किती मनावर घेते, ते बघूच. सध्या करिना ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात बिझी आहे. आई बनल्यानंतर ‘वीरे दी वेडिंग’  या चित्रपटाद्वारे करिना कमबॅक करतेय. तैमूरच्यावेळी प्रेग्नंट असताना करिनाचे वजन बरेच वाढले होते. पण ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटपूर्वी करिना तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस लूकमध्ये परतली. अनेक महिने जिममध्ये घाम गाळून तिने २० किलो वजन कमी केले. यासाठी करिनाला कडक डाएट फॉलो करावे लागले. तितकाच घाम गाळावा लागला.
Web Title: I have seen malnutrition, eat some food ...! Kareena Kapoor's advice to the users !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.