निर्मात्यांकडे माझ्या लायकीच्या भूमिका नाहीत -मनोज वाजपेयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:56 PM2018-08-30T17:56:04+5:302018-08-30T17:56:42+5:30

आपल्या दमदार अभिनयाने ओळखले जाणारे मनोज वाजपेयी यांचा नुकताच रिलीज झालेला ‘सत्यमेव जयते’ एकीकडे बॉक्स आॅफिसवर धमाका करत आहे, तर दुसरीकडे त्यांचा अपकमिंग ‘गली गुलियां’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

 I do not have the role of my competitor to makers- Manoj Vajpayee | निर्मात्यांकडे माझ्या लायकीच्या भूमिका नाहीत -मनोज वाजपेयी

निर्मात्यांकडे माझ्या लायकीच्या भूमिका नाहीत -मनोज वाजपेयी

googlenewsNext

श्वेता पांडे

आपल्या दमदार अभिनयाने ओळखले जाणारे मनोज वाजपेयी यांचा नुकताच रिलीज झालेला ‘सत्यमेव जयते’ एकीकडे बॉक्स आॅफिसवर धमाका करत आहे, तर दुसरीकडे त्यांचा अपकमिंग ‘गली गुलियां’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी मनोज यांना नुकताच एका फिल्म फेस्टिवलमध्ये ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा अवॉर्ड मिळाला. या चित्रपटाच्या प्रवासाबाबत मनोज यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...  

* ‘गली गुलियां’ चित्रपटाचे कथानक काय आहे? 
- ही एक अशा व्यक्तिची कथा आहे, जो मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब आहे. तो अंघोळ करु इच्छित नाही, जेवनात त्याला आवड नाही. मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गर्क आहे. या भूमिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक अशी कथा येईल, जी प्रेक्षकांना स्वत:शी जोडेल. ही एक नवी कथा आहे. सत्य घटनेवर आधारित आहे. दिग्दर्शकाच्या बालपणीत घडलेल्या काही सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे.  

* या चित्रपटास होकार देण्याचे काही विशेष कारण? 
- दिग्दर्शकाच्या भूतकाळासह स्क्रिप्टने देखील मला प्रभावित केले. मला खूपच बरे वाटत आहे की, माझा निर्णय योग्य ठरला. या चित्रपटाने मला आंतरराष्ट्रीय  स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली.  

* सायकोलॉजिकल थ्रिलर बॉलिवूडच्या सर्वात कमकुवत प्रकारांपैकी एक आहे, या चित्रपटाने कोणती विचारसरणी बदलेल? 
- या चित्रपटाने विचारसरणी कोणत्या हद्द पर्यंत बदलेल, हे सांगू शकत नाही. मात्र एवढा विश्वास आहे की, प्रेक्षक नाराज होणार नाहीत. हा चित्रपट ट्रायड अ‍ॅण्ड टेस्टेड आहे. मेलबर्नमधील इंडियन फिल्म फेस्टिवल्स मध्ये ‘बेस्ट एक्टर’चा अवॉर्ड मिळाला आहे. आपल्याशीच ही एक स्पर्धा आहे, जिचा सामना मी केला आणि त्यात पासदेखील झालो.  

* कलाकारापासून भूमिका काही घेऊन तर काही देऊन जाते, यावेळी कोणता अनुभव प्रत्ययास आला?  
- ही भूमिका माझ्याकडून फक्त घेऊनच गेली आहे. माझी बुद्धीमत्ता डिस्टर्ब करुन गेली आहे. मला खूपच त्रस्त केले आहे या भूमिकेने. दिड महिन्यापासून माझे वजन सतत घटत होते. या दरम्यान मला मलेरियादेखील झाला होता. मग २८ व्या दिवशी मी दिग्दर्शकाला सांगितले की, लवकर शूटिंग पूर्ण करा, नाहीतर मी हॉस्पिटलाइज होऊ शकतो. मी यासाठी खूपच मेहनतदेखील केली आहे. या चित्रपटाची शूटिंग रिअल लोकेशन्सवर झाली आहे. या दरम्यान मला कोणी ओळखूही शकत नव्हते.  

* अशा चित्रपटास प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप कमी मिळतो, याचे कारण काय?
 - प्रेक्षक कमी  मिळत नाही, मात्र असे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. खरे तर, स्वतंत्र चित्रपटांना शोज दिले जात नाहीत. असे चित्रपट बनविण्यासाठी मार्केट पैसे देत नाही, तर आपल्या खिशातील पैशांनी चित्रपट बनविले जातात. आता कमी शोजमध्ये रिलीज होतात, म्हणून प्रेक्षक त्याठिकाणी जेवढे असतात, तेवढेच मिळतात. मात्र वर्ड आॅफ माउथने कमाई होते. डिजिटल माध्यमातूनही कमाई होते. रिलीजच्या वेळी जरी कमाई झाली नसेल, मात्र अशा चित्रपटांचा कंटेंट वर्षानुवर्ष चालतो. मनोज वाजपेयी अशाच चित्रपटांमुळे अस्तित्वात राहिल.

* आपण कमर्शिअल चित्रपटांमध्ये खूपच कमी दिसता, का?
 - विशेषत: कमर्शिअल चित्रपट निर्मात्यांकडे माझ्या लायकीची भूमिका नसते. माझी तर साधी आणि सरळ मागणी आहे की, साइड रोल करणार नाही. एकतर नायकाच्या बरोबरीची भूमिका द्या नाहीतर नायकच बनवा. कथा चांगली असावी, सोबतच पैसेही चांगले मिळावेत, पोस्टरवरदेखील माझा चेहरा असावा. तसा मी परफॉर्मन्स ओरिएंटेड चित्रपटांसाठीच ओळखला जाईल.  

* स्टार आणि अ‍ॅक्टर दरम्यान एवढे मोठे अंतर का आहे? 
- अ‍ॅक्टर म्हणजेच परफॉर्मर. त्याचे लक्ष कॅरेक्टर प्ले करण्यावर असते, मात्र पॉप्युलर अ‍ॅक्टरचे काम लोकांचे लक्ष आपल्याकडे वळविण्याकडे असते. ट्रू परफॉर्मरचे लक्ष कॅरेक्टरकडे असते आणि पॉप्युलर अ‍ॅक्टरचे लक्ष प्रोजेक्टकडे असते. एकंदरीत बिझनेस प्रॉस्पेक्ट्स असतो. तर परफॉर्मर हे पाहतो की, असे कोणते कथानक दर्शविले जाईल जे लोकं वर्षानुवर्ष स्मरणात ठेवतील. फरक फक्त इंटेशनचा असतो. 

* हॉलिवूड जाण्याचा विचार आहे?
-  माझ्याकडे हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी वेळच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे ब्राउन स्क्रीनवाल्यांसाठी निवडकच भूमिका लिहिल्या जातात. विशेषत: पुरुषांसाठी खूपच कमी काम आहे. तिथे काम करण्यासाठी त्याठिकाणी राहावे लागेल, आणि मी इथे आहे. आता इथे खूपच काम आहे. 

* दिग्दर्शनाच्या बाबतीत काय विचार आहे?
- दिग्दर्शनाच्या बाबतीत काहीच विचार केला नाही, मात्र कथानक येईल तर नक्की करेल.  
 

Web Title:  I do not have the role of my competitor to makers- Manoj Vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.