I do not like the competition! | ​ स्पर्धा मला आवडतच नाही!


 बॉलिवूडचा ‘सीरियल किसर’ इमरान हाश्मी आता ‘अझहर’च्या निमित्ताने ‘सीरिअस’ भूमिकांकडे वळला आहे. रोमँटिक  चित्रपटांचा मार्ग सोडून आता त्याने वेगळ्या विषयावरील चित्रपटावर काम करण्याचा आव्हानात्मक निर्णय घेतलाय. अभिनयाची उत्तम जाण, भूमिकेची ओळख, उठावदार व्यक्तिमत्त्व, गुड लुकिंग पर्सनॅलिटी अशी वैशिष्टे असेला इमरान आता भारतीय क्रिकेटर मोहम्मद अजहरू द्दीन याच्या जीवनावर आधारित ‘अझहर’ या चित्रपटात काम करणार आहे. ‘अजहर’च्या प्रमोशनदरम्यान इमरान हाश्मीने ‘सीएनएक्स डिजिटल’च्या एडिटर जान्हवी सामंत यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने क्रिकेटविश्वातील घडामोडी, त्याचा भूमिकेविषयीचा सराव, त्याचे योगदान याविषयी अगदी दिलखुलास गप्पा केल्या. 

प्रश्न: अझहरच्या भूमिकेकडे तू कसा बघतोस?
इमरान - एक व्यक्ती म्हणून अझहर हा अत्यंत स्टायलिश राहत असे. एखाद्या क्रिकेटरमध्ये असावा तसा चार्म, उत्साह त्याच्यात असायचा. कॉलर वर करून चालायची त्याला सवय होती. त्याला घड्याळे, सुट्स यांची प्रचंड आवड होती.  अतिशय मोकळ्या मनाचा आणि ‘डाऊन टू अर्थ’ असा हा माणूस. त्याला खेळताना पाहणे तर सुखद आहेच पण त्याला भेटून त्याची भूमिका स्क्रीनवर साकारणे हे माझ्यासाठी कलाकार म्हणून जशी आनंदाची बाब होती. तसेच मोठे आव्हानही होते. 

प्रश्न : ही क्रिकेटरची भूमिका आहे. मग काय तू क्रिकेट शिकलास?
इमरान - हो. क्रि केट व्हिडिओच्या माध्यमातून तर मी शिकलोच. पण, स्वत: अझहरकडूनही मी प्रशिक्षण घेतले आहे. क्रिकेट शिकणं किंवा खेळणं हे कधीच आव्हान नव्हतं पण, त्याच्यासोबतचे सर्व खेळाडू, त्यांची शैली अगदी खरी वाटली पाहिजे अशी वातावरण निर्मिती करणे हे चित्रपटाच्या टीमसमोर विशेष आव्हान होते. त्याची चालण्याची पद्धत, डोके वळवणे हे सर्व मला माझ्यामध्ये उतरवून घ्यावे लागले. मी वास्तविक भूमिक ा कधीही केल्या नाहीत. त्यामुळे मी कधी स्वत:ला कुणाच्या जागेवर ठेवून बघितले नाही. या चित्रपटासाठी मला ते करावे लागले.  

प्रश्न: ‘सीरियल किसर’ ते ‘अझहर’ काय बदल झालाय?
 इमरान - बराच बदल झालाय. मी इंडस्ट्रीत एक बोल्ड कलाकार म्हणून एन्ट्री केली होती. मला जो चित्रपट दिला जायचा तो मी करत असे. माझ्या भूमिकांबद्दल चाहत्यांमधून टीकाही व्हायची. त्यावेळी माझ्याकडे क रिअरच्या दृष्टीने कुठलाच प्लॅन नव्हता. पण, माझा चित्रपटांचा एकच ट्रेंड सेट होत गेला. त्या वलयाला तोडून गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येणे हे माझ्यासाठी एक आव्हानच होते. शांघाय, डर्टी पिक्चर या चित्रपटांनंतर चाहतावर्ग माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहू लागला. मात्र, आजही मी माझ्यासाठी भूमिकेची बंधने लादलेली नाहीत. 

्रप्रश्न : तू यशाचे मोजमाप कसे करतोस?
 इमरान - मी आतापर्यंत अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांचे चित्रपट बघत मोठा झालो आहे. बॉलिवूडनंतर मी हॉलिवूड चित्रपट खूप पाहिले. भूमिकेला समजून घेण्याचा जो एक समजूतदारपणा असतो तो मला हॉलिवूडमध्ये दिसला. पण, बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर मी तशाच भूमिकेला समजून घेणाºया भूमिका करायला सुरुवात केली. यश मिळत गेले, चाहतावर्ग तयार होत गेला पण, कुठल्याही कौतुकाची अपेक्षा, अवॉर्डसची अपेक्षा न ठेवता मी कलाकाराचं काम करत राहिलो. आजही मला कोणी यशाचे मोजमाप काय याबद्दल विचारले तर मी हेच सांगेन की, चाहत्यांकडून माझ्या भूमिकेला मिळालेली कौतुकाची थाप ही मला जास्त महत्त्वाची वाटते. तसेस मला दुसºयांशी स्पर्धा करायलाही आवडत नाही. 
Web Title: I do not like the competition!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.