'Hum Aapke Hain Ke Kona', 'Anupam Kher in the scene', you will be tired of hearing the reality of the face! | 'हम आपके हैं कौन' सिनेमाच्या 'त्या' सीनमधील अनुपम खेर यांच्या 'चेह-यामागचं वास्तव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. भूमिका कोणतीही असो तिला अनुपम खेर यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे.चरित्र अभिनेता, खलनायक, विनोदी, गंभीर अशा विविध स्वरुपातील भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. त्यामुळे रसिकांच्या मनात अनुपम खेर यांचं वेगळं स्थान आहे.बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारे आणि रसिकांचे लाडके असलेले अनुपम अंकल यांचा आजवरील जीवनप्रवास सोपा नव्हता.त्यांनाही करियरमध्ये बरंच स्ट्रगल करावं लागलं. मात्र त्यांच्या आयुष्यात असा एक क्षण आला ज्याचा विचार कुणीही करुच शकत नाही.मात्र त्यावेळीसुद्धा अनुपम खेर डगमगले नाहीत. याबाबत एक किस्सा अनुपम खेर यांनी एका शोमध्ये सांगितला. 'सांराश' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अनुपम खेर यांचा जीवनप्रवास कधीच सोपा नव्हता. मात्र सारांश सिनेमानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभिनयामुळे त्यांनी रसिकांची मनं जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मात्र करियरच्या ऐन भरात असताना आणि विविध सिनेमा हातात असताना एक बाका प्रसंग अनुपम खेर यांच्यावर ओढवला. 'हम आपके कौन है' या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अनुपम खेर यांना पॅरालिसिस (लकवा)चा झटका आला होता. त्याबाबतची आठवण अनुपम खेर यांनी या शोमध्ये सांगितली. एकदा अनुपम खेर हे अनिल कपूरच्या घरी जेवायला गेले होते. त्यावेळी अनिल कपूर यांच्या पत्नीच्या लक्षात आले की अनुपम खेर यांच्या एका डोळ्याच्या पापण्या हालचाल करत नाहीत. त्यानंतर ते घरी आले. दुस-या दिवशी सकाळी ब्रश करत असताना तोंडातून पाणी येऊ लागलं. हे पाहून काहीच समजलं नाही आणि तात्काळ यश चोप्रा यांच्याशी संपर्क साधला असं खेर यांनी सांगितलं.यशजींनी त्यावेळी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांकडे गेलो तेव्हा पॅरालिसिसचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी त्यावेळी 2 महिने काम बंद करण्याचा सल्लाही दिला होता असं खेर यांनी सांगितलं. मात्र डॉक्टरकडून तपासणी झाल्यानंतर अनुपम खेर थेट हम आपके कौन है सिनेमाच्या शूटिंगसाठी पोहचले. अनुपम खेर यांचा वाकडा झालेला चेहरा पाहून कुणालाच काही समजलं नाही. सलमान खान आणि माधुरीला तर वाटले की ते मस्करी करत आहेत. मात्र सत्य सांगितल्यानंतर सिनेमाची टीम हादरली होती. मात्र अशा परिस्थितीतही अनुपम खेर यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चेहरा वाकडा असतानाही त्यांनी 'हम आपके है कौन' सिनेमाचं शूटिंग केलं. त्यामुळेच या सिनेमाच्या सीन्समध्ये अनुपम खेर यांचा एकही क्लोज शॉट घेण्यात आलेला नाही. एका सीनमध्ये मात्र अनुपम खेर यांचा चेहरा वाकडा झाल्याचं सिनेमा पाहताना दिसतं. या सिनेमातील एका सीनमध्ये अनुपम खेर यांनी शोलेतील धर्मेंद्रच्या वीरुप्रमाणे दारु प्यायल्याची अॅक्टिंग केली होती. या सीनमध्येच फक्त अनुपम खेर यांचा चेहरा वाकडा झाल्याचं दिसतं. मात्र त्या कठीण परिस्थितीतही जे धैर्य आणि जिद्द अनुपम खेर यांनी दाखवले त्यामुळेच त्या सीनमध्ये चेहरा वाकडा असूनही ते अॅक्टिंगच करत असल्याचे आजही रसिकांना वाटतं.


 
Web Title: 'Hum Aapke Hain Ke Kona', 'Anupam Kher in the scene', you will be tired of hearing the reality of the face!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.