हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’चा ट्रेलर अन् भन्नाट मीम्स...! हसून हसून दुखेल पोट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 11:45 AM2019-06-06T11:45:50+5:302019-06-06T11:48:14+5:30

हृतिकक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. गत मंगळवारी ‘सुपर 30’ ट्रेलर प्रदर्शित झाला. तूर्तास हा ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय. होय,‘सुपर 30’च्या ट्रेलरवरचे जोक्स आणि मीम्स यांचा सोशल मीडियावर जणू पूर आला आहे.

 Hrithik Roshan's 'Super 30' Trailer And False Means ...! Smile smile !! | हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’चा ट्रेलर अन् भन्नाट मीम्स...! हसून हसून दुखेल पोट!!

हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’चा ट्रेलर अन् भन्नाट मीम्स...! हसून हसून दुखेल पोट!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सुपर 30’ हा आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.  

हृतिकक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. गत मंगळवारी ‘सुपर 30’ ट्रेलर प्रदर्शित झाला. तूर्तास हा ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय. होय,‘सुपर 30’च्या ट्रेलरवरचे जोक्स आणि मीम्स यांचा सोशल मीडियावर जणू पूर आला आहे.
 चित्रपटातील ‘इतना गलत कैसे हो सकते हैं भाई’ आणि ‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा’ या चित्रपटातील डायलॉगवर तर नेटक-यांनी भन्नाट मीम्स तयार केले आहेत. अनेक मीम्समध्ये राजकीय पक्षांनाही ट्रोल केले जातेय.

‘सुपर 30’ हा चित्रपट दीर्घकाळापासून रखडला आहे. आधी हा चित्रपट नोव्हेंबर 2018 मध्येच प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलचे नाव मीटू मोहिमेत आले. त्यामुळे त्याला या चित्रपटातून हटवण्यात आले. साहजिकच ‘सुपर 30’ लांबला. पुढे या चित्रपटासाठी 26 जानेवारी 2019 चा मुहूर्त ठरला. पण यावेळी कंगनाचा ‘मणिकर्णिका’ आडवा आला. त्याहीवेळी हृतिकने ‘सुपर 30’ची रिलीज डेट पुढे ढकलली होती. ‘सुपर 30’ हा आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.  
तूर्तास ‘सुपर 30’वरचे भन्नाट मीम्स पाहा आणि पोटभर हसा...

Web Title:  Hrithik Roshan's 'Super 30' Trailer And False Means ...! Smile smile !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.