हृतिक रोशन व कंगना राणौत यांच्यातील वाक्युद्ध कुणापासून लपून राहिलेय? कंगनाने हृतिकबद्दल इतके धक्कादायक खुलासे केलेत की, सगळेच अवाक झालेत. अलीकडे ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगना आली आणि तिने हृतिक व तिच्या रिलेशनशिपच्या अध्यायाचे एक -एक पान वाचून दाखवले. विशेष म्हणजे, या मुलाखतीनंतर लोकांनी कंगनाला पाठींबा दिला. या संपूर्ण प्रकरणात हृतिक रोशनची बाजू ऐकून घेण्याची गरजही लोकांना वाटली नाही.   आम्ही असे का बोलतोय,असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही हृतिकबद्दल लोकांनी काय काय म्हटले ते वाचायलाच हवे.
कंगनाच्या मुलाखतीनंतर हृतिकने twitterवर एक tweet केले. या tweet नंतर लोकांच्या संतापाचा फुगा फुटला आणि लोकांनी हृतिकला चांगलेच खरेखोटे सुनावले. आम्ही तुझा आधी खूप आदर करायचो. पण कंगनाच्या मुलाखतीनंतर आमच्या नजरेतून तू उतरला आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. हृतिकची बाजू ऐकून न घेता लोकांनी अशी प्रतिक्रिया द्यावी, हे निश्चितच धक्कादायक आहे.

ALSO READ : केवळ हृतिक रोशनचं नाही तर या अनेकांशी झालेयं कंगना राणौतचे भांडण!

अर्थात या संपूर्ण प्रकरणात हृतिकला साथ देणारेही काही आहेत.  कंगनाने ‘सिमरन’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जुने मुडदे उखरून काढल्याचा आरोप या काहींनी केला आहे. मात्र कंगनाने या आरोपांनाही खरमरीत उत्तर दिले आहे. मीडियावालेच मला विचारतात. त्यांनी मला माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल प्रश्न विचारू नये, मीही बोलणार नाही किंवा यापेक्षा चांगला उपाय म्हणजे, मला मुलाखतीसाठीच बोलवू नका. मुलाखतीला बोलवलेच नाही तर मी काही बोलणार नाही आणि माझ्या बोलण्यामुळे लोकांना त्रासही होणार नाही, असे ती म्हणाली. आता या संपूर्ण प्रकरणात तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, ते ठरवा आणि आम्हाला नक्की कळवा.
Web Title: Hrithik Roshan, we first respected you, but now ... !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.