Hrithik Roshan was going to drown in water during filming of this film | ​या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी हृतिक रोशन बुडणार होता पाण्यात

हृतिक रोशनने त्याच्या करियरची सुरुवात कहो ना प्यार है या चित्रपटापासून केली. या चित्रपटात त्याने राज आणि राहुल अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये असलेले वेगळेपण त्याने त्याच्या अभिनयातून दाखवून दिले होते. हृतिकच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने त्याला रातोरात सुपरस्टार बनवले. हृतिकला या चित्रपटासाठी सर्वोत्तम नवोदित कलाकार हा पुरस्कार मिळाला. पण त्याचसोबत फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील त्याने या चित्रपटासाठी पटकवला होता.
हृतिक रोशनने या चित्रपटानंतर धुम, जोधा अकबर, क्रिश, कोई मिल गया यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. पण त्याच्यासाठी कहो ना प्यार है हा चित्रपट नेहमीच स्पेशल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती हृतिकचे वडील आणि अभिनेता राकेश रोशन यांनीच केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणात काहीही कमतरता भासू नये यासाठी हृतिकने आणि या चित्रपटाच्या टीमने सगळे प्रयत्न केले होते. या चित्रपटात रोहितचा मृत्यू होतो असे आपल्याला पाहायला मिळाले होते. रोहित काही लोकांना खून करताना पाहातो आणि ते रोहितचा पाठलाग करतात आणि या वेळी रोहित बाईकवरून जात असताना त्याचा अपघात होतो आणि त्याची गाडी थेट पाण्यात पडते. त्या दृश्यात रोहित पाण्यात कसा पडतो तसेच तो पाण्यात बुडतो, त्याच्या डोक्याला दगड लागतो असे चित्रपटात दाखवण्यात आले होते. हे दृश्य चित्रीत करणे खरे तर खूपच कठीण होते. पण राकेश रोशन आणि त्यांच्या टीमने हे दृश्य खूपच चांगल्याप्रकारे चित्रीत केले. पण तुम्हाला माहीत आहे का, या दृश्याचे चित्रीकरण करत असताना हृतिक थोडक्यात वाचला होता. हृतिकनेच काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. त्याने मुलाखतीत म्हटले होते की, कहो ना प्यार है या चित्रपटात रोहित पाण्यात बुडतो या दृश्याचे चित्रीकरण करत असताना मी पाण्यात बुडत होतो. पण चित्रपटाच्या टीमने योग्यवेळी मला वाचवल्याने एक मोठा अनर्थ टळला. 

Also Read : ह्रतिक रोशनचे फॅन्स आहात, मग ही बातमी नक्की वाचा !
Web Title: Hrithik Roshan was going to drown in water during filming of this film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.