Hrithik Roshan said finally! Kansna's official reply to Rana's allegations !! | अखेर हृतिक रोशन बोलला! कंगना राणौतच्या आरोपांना दिले ‘आॅफिशिअल’ उत्तर!!

कंगना राणौत आणि हृतिक रोशन या दोघांच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’ने आज अचानक एक वेगळेच वळण घेतले. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगना आली आणि हृतिक रोशनबद्दल बरेच काही बोलून गेली. हृतिक सोबत माझे अफेअर होते, मी त्याच्याशी लग्न करायलाही तयार होते. हृतिकनेही पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर लग्नाची तयारी दर्शवली होती. पण नंतर तो पलटला आणि माझे पर्सनल मॅसेज व व्हिडिओ लीक करण्याची धमकी मला दिली, असे काय काय कंगना या शोमध्ये बोलली. हृतिकने माझी माफी मागावी, तोपर्यंत हा वाद थांबणार नाही, असेही ती यावेळी बोलून गेली. खरे तर यापूर्वीही कंगना व हृतिकचा वाद गाजला होता. प्रकरण एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवण्यापर्यंत गेले होते. पण अलीकडे ‘आप की अदालत’मध्ये कंगना आली आणि हे प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. कंगनाच्या या सगळ्या आरोपांवर हृतिकची प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण हृतिकने मौन बाळगणे पसंत केले होते. पण पाणी डोक्यावर जावू लागले म्हटल्यावर कदाचित हृतिकला बोलावेच लागले. आज हृतिकने एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी करून कंगनाच्या सगळ्या आरोपांना उत्तरे दिलीत. आपल्या स्टेटमेंटमध्ये हृतिकने कंगनाच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. ‘woman in question’असा उल्लेख त्याने केला आहे. ‘सतत चर्चेत असलेल्या त्या लेडीला मी आयुष्यात खासगीत कधीच भेटलेलो नाही. मी तिच्यासोबत काम केलेय, हे खरे आहे. पण सीक्रेट मीटिंग म्हणाल तर हे खोटे आहे, असे हृतिकने म्हटले आहे.
या स्टेटमेंटमध्ये हृतिकने म्हटले आहे की, मला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे.  अफेअरच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मी हे सगळे बोलत नाहीयं किंवा स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याचा माझा बालिश प्रयत्नही नाहीय.  
दुदैवाने मीडिया व लोकांना सत्य गोष्टींऐवजी खोट्या गोष्टींवर चटकन विश्वास बसतो. मी तिच्यासोबत जानेवारी २०१४ मध्ये साखरपुडा केले, असा माझ्यावर आरोप आहे. पण याचा एकही पुरावा नाही. ना फोटो, ना साक्षीदार. जानेवारी २०१४ मध्ये मी देशाबाहेर गेलोच नव्हतो. माझे पासपोर्ट डिटेल्स याचा पुरावा आहेत. पण याऊपरही आरोप होत आहेत. काही फोटोशॉप्ड फोटोंना पुढे करून  ‘सो कॉल्ड’ रिलेशनशिपच्या कथा रचल्या जात आहेत. मी इतकेच म्हणेल की, सत्य काय ते जाणून घेतल्याशिवाय जज करू नका. मी कमालीचा शांतताप्रीय व्यक्ती आहे. 
मी आयुष्यात एकही व्यक्तीशी भांडलेलो नाही. माझा घटस्फोटही अतिशय शांततेत झाला. मला इथे कुणालाही जज करायचे नाही किंवा कुणावरही आरोप करायचे नाही. पण मला खरे सांगणे गरजेचे वाटतेय. माझ्यामुळे माझ्या आजुबाजूचे लोक प्रभावित होत असतील तर मला सत्य सांगावेच लागेल.
 

Web Title: Hrithik Roshan said finally! Kansna's official reply to Rana's allegations !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.