Hrithik Roshan opened with X-Wife Sujain Khan Read detailed !! | ​ एक्स-वाईफ सुजैन खान हिच्यामुळे उघडले हृतिक रोशनने तोंड! वाचा सविस्तर !!

हृतिक रोशन व सुजैन खान  या दोघांचा घटस्फोट झाल्याय पण दोघांमधीलही मैत्री अद्याप संपलेली नाही. घटस्फोटानंतरही दोघेही अनेकदा एकत्र दिसतात, हा त्याचाच पुरावा आहे. हृतिकच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात सुजैन आवर्जून हजेरी लावली. दोघेही मुलांसोबत हॉली डे एन्जॉय करतात. खरे तर हृतिक व सुजैन यांच्या घटस्फोटानंतर अनेक चर्चा रंगल्या. या घटस्फोटामागचे कारण काय, यानिमित्ताने नाही नाही ते बोलले गेले. पण याऊपरही अटीतटीच्या वेळी एक्स वाईफ सुजैन हृतिकच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहिली. कदाचित या प्रकरणातही. आम्ही कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुम्हाला कळलेच असेल. होय, आम्ही बोलतोय ते हृतिक व कंगना राणौत या दोघांच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’बद्दल.काल-परवा हृतिकने कंगनाच्या आरोपांना उत्तर देणारे एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले होते. मी कंगनाला खासगीरित्या कधीही भेटलेलो नाही, असा दावा त्याने यात केला होता. यानंतर  या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर  हृतिकने अर्नब गोस्वामी यांना एक दीर्घ मुलाखत दिली. या मुलाखतीत हृतिकने प्रथमच जाहिरपणे आपली बाजू मांडली. कंगनाच्या आरोपांचा माझ्या आजूबाजूच्या लोकांवर वाईट परिणाम होऊ लागला होता. माझ्यामुळे माझ्या जवळची माणसं प्रभावित व्हावीत, असे मला वाटत नाही आणि त्यामुळेच मी आता या सगळ्या प्रकरणावर बोलणार आहे, असे हृतिक यावेळी म्हणाला. हृतिकच्या या कंगनाविरोधात जाहिरपणे बोलण्याच्या निर्णयामागे सुजैन असल्याची बातमी आहे.

ALSO READ : Shocking Revelations !! कंगना राणौतच्या आरोपांना हृतिक रोशनने अशी दिली उत्तरे!

होय, चर्चा खरी मानाल तर, सुजैन हिनेच हृतिकला आपली बाजू मांडण्याचा सल्ला दिला. कंगनाचे सगळे आरोप खोटे आहेत, यावर सुजैनचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे तिनेच आपल्या एक्स-हसबण्डला याप्रकरणी लोकांसमोर येण्यासाठी राजी दिले. मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्या आरोपांना खंबीरपणे सामोरे जा, असे सुजैनने हृतिकला सांगितल्याचे कळते. आता ही चर्चा खरी असेल तर सुजैनने आता राहिले नसलेल्या नात्याचा धर्मचं निभावला, असे म्हणता येईल.मध्यंतरी कंगनाच्याआरोपांच्या पार्श्वभूमीवर सुजैनने एक टिष्ट्वट करत, हृतिकला पूर्ण पाठींबा दिला होता. माझा हृतिकवर पूर्ण विश्वास आहे. भविष्यातही त्याच्यावरचा विश्वास कमी होणार नाही, असे तिने म्हटले होते. कोणत्याही आरोपांमध्ये आणि कटकारस्थानांमध्ये एवढी शक्ती नाहीये की, ती एका चांगल्या व्यक्तीवर विजय मिळवू शकेल,असे टिष्ट्वट तिने केले होते. 
Web Title: Hrithik Roshan opened with X-Wife Sujain Khan Read detailed !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.