Hrithik Roshan once again got up? | ऋतिक रोशन पुन्हा एकदा चढणार बोहल्यावर ?
ऋतिक रोशन पुन्हा एकदा चढणार बोहल्यावर ?
अभिनेत्री ऋतिक रोशन सध्या तिचा आगामी चित्रपट सुपर 30 च्या कामात बिझी आहे. त्यातच  ऋतिक रोशन पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याचे समजते आहे. ऋतिक आपली एक्स वाईफ सुजैन खानसोबत पुन्हा एकदा लग्नाच्या गाठीत अडकणार असल्याचे कळतेय. कहो ना प्यार है चित्रपट रिलीज झाल्यानंतर ऋतिकने आपले पहिले प्रेम सुझैनसोबत 2000 साली लग्न केले होते. मात्र दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर 14 वर्षांनी ते वेगळे झाले होते. 2014 मध्ये ऋतिक आणि सुझैनने घटस्फोट घेतला होता. ऋतिक आणि सुझैनला दोन मुलं सुद्धा आहेत मोठ्या मुलाचे नावं रेहान आणि छोट्या रिदान. घटस्फोट झाल्यानंतरही दोघं अनेक वेळा व्हेकेशनवर मुलांसोबत एकत्र दिसायचे. ऋतिकच्या बर्थ डे पार्टीतही सुझैन आवर्जुन उपस्थित होती. अनेक सर्वाजनिक ठिकाणी आणि पार्टींजच्या ठिकाणी दोघे एकमेकांसोबत यायचे. यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या की दोघे पुन्हा एकत्र येणार. मुलांसाठी दोघांनी परत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.     

सुपर 30 चित्रपट प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमारा यांच्या आयुष्यावर आधारित आहेत. आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात. चित्रपटात ही भूमिका ऋतिक रोशन साकारणार आहे. 

ALSO READ :  Shocking Revelations !! कंगना राणौतच्या आरोपांना हृतिक रोशनने अशी दिली उत्तरे!

Web Title: Hrithik Roshan once again got up?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.