Hrithik Roshan feared by 'This' star with Bodyguard; Tears came in the eyes! | बॉडीगार्डसोबत ‘या’ स्टारला बघून घाबरला हृतिक रोशन; डोळ्यात आले होते अश्रू!

हृतिक रोशनला बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि गुडलूकिंग अभिनेत्यांपैकी समजले जाते. हिंदी चित्रपटात १९८० मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारा हृतिक २००० मध्ये आलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये खºया अर्थाने सक्रिय झाला. हृतिकचा हा चित्रपट रिलीज होताच तो रातोरात सुपरस्टार झाला. या चित्रपटासाठी त्याला एक दोन नव्हे तर तब्बल सहा फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले. या चित्रपटातील हृतिकचा अभिनय तर सरस होताच शिवाय त्याच्या हटके डान्स स्टाइलने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ पाडली होती. हृतिक डान्स आयकॉन मायकल जॅक्सनचा प्रचंड फॅन आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित एक रोचक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हृतिक रोशन त्याच्या एका चित्रपटाचे न्यूयॉर्क येथे शूटिंग करीत होता. शूटिंगदरम्यान एक दिवस हृतिक सकाळी सकाळी त्याच्या वेनेटी व्हॅनमध्ये बसलेला होता. तेव्हा अचानकच काही बाउन्सर त्याच्या वेनेटी व्हॅनमध्ये घुसले होते. अचानकच एवढे सगळे बाउन्सर त्याच्या वेनेटी व्हॅनमध्ये आल्याने हृतिक प्रचंड घाबरला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले होते. काही वेळानंतर पॉप स्टार मायकल जॅक्सन हृतिकच्या समोर येऊन उभा राहिला. हृतिक लहानपणापासूनच मायकल जॅक्सनच्या डान्स स्टेप फॉलो करीत आल्याने, त्याला मायकल जॅक्सनला भेटण्याची तीव्र इच्छा होती. अशाच दस्तुरखुद्द मायकल जॅक्सनच त्याच्या समोर आल्याने, हृतिकची अवस्था खूपच केविलवाणी झाली होती. त्याचे असे झाले होते की, हृतिक ज्याठिकाणी ‘काइट्स’ची शूटिंग करीत होता, त्याच्या थोड्या अंतरावर मायकल जॅक्सन त्याच्या अल्बमची शूटिंग करीत होता. ही बाब हृतिकला माहिती होती, परंतु त्याला मायकलची भेट घेणे शक्य नव्हते. मात्र जेव्हा मायकल जॅक्सनला हृतिकच्या शूटिंगबद्दल माहिती पडले तेव्हा तो स्वत:हून हृतिकला भेटायला आला. परंतु त्याच्यासोबत असलेला बॉडीगार्डचा लवाजमा बघून हृतिकची चांगलीच भंबेरी उडाली होती. 
Web Title: Hrithik Roshan feared by 'This' star with Bodyguard; Tears came in the eyes!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.