Hrithik Roshan becomes the world's largest handshake actor; Tiger Salman Khan seventh place! | जगातील सर्वांत हॅण्डसम अभिनेता बनला हृतिक रोशन; टायगर सलमान खान सातव्या स्थानी!

बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन याच्याशी संबंधित एक खूपच चांगली बातमी समोर येत आहे. होय, हृतिक रोशन याने हॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना मागे टाकत जगातील सर्वांत हॅण्डसम अभिनेता म्हणून लौकिक मिळविला आहे. हृतिकसाठी ही खूपच मोठी अ‍ॅचिव्हमेंट असल्याचे बोलले जात आहे. कारण या रेसमध्ये त्याने जगातील अनेक अभिनेत्यांना मागे टाकले आहे, तर मोस्ट बॅचरल अभिनेता असलेला सलमान खान या यादीत सातव्या स्थानावर आहे. 

worldstopmost.com या वेबसाइटने नुकतेच जगातील हॅण्डसम अभिनेत्यांची यादी घोषित केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने स्थान मिळविले आहे. हृतिकने रॉबर्ट पॅटिनसन आणि क्रिस इवांसलाही मागे टाकले आहे. या यादीत टॉम हिडलेस्टन, हेनरी कॅविल, नूह मिल्स यांसारख्या अनेक हॉलिवूड अभिनेत्यांनी स्थान मिळविले आहे. 

जगातील मोस्ट टॉप टेन हॅण्डसम अभिनेत्यांची यादी-२०१८
१) हृतिक रोशन
२) ब्रॅड पिड
३) गोडफ्रे गाओ
४) रॉबर्ट पॅटिनसन
५) डेंजन वॉशिंग्टन
६) उमर बोरकान अल गाला
७) सलमान खान
८) नोह मिल्स
९) टॉम क्रुझ
१०) प्रिन्स विल्यम


तसेच या यादीत बॉलिवूडचा टायगर सलमान खान यानेही स्थान मिळविले आहे. तो या वेबसाइटच्या यादीत स्थातव्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी हृतिक रोशन या यादीत तिसºया, तर सलमान खान दहाव्या स्थानावर होता. मात्र यंदा दोघांनीही यादीत प्रगती करीत तीन स्थानांनी प्रगती केली आहे. त्यानुसार हृतिकने क्रमांक एकचे स्थान मिळविले तर सलमान सातव्या स्थानावर आला. 

हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘सुपर ३०’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पटना येथील मॅथेमॅटिसियन आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. हृतिक या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेत आहे. यासाठी त्याने पटना येथे जाऊन आनंदकुमारची भेटदेखील घेतली. या चित्रपटानंतर हृतिक त्याच्या वडिलांच्या ‘क्रिश-४’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. 
Web Title: Hrithik Roshan becomes the world's largest handshake actor; Tiger Salman Khan seventh place!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.