How many celebrities do the 'Dhad' artist get? Read the news if you want to know !! | ​‘धडक’च्या कलाकारांनी किती घेतले मानधन? जाणून घ्यायचे तर वाचा बातमी!!

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा लाडका बंधू ईशान खट्टर यांचा आगामी चित्रपट ‘धडक’ येत्या २० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. कालपरवा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि लोकांची उत्सुकता ताणली गेली. जान्हवीचा हा डेब्यू सिनेमा असल्याने ट्रेलर पाहून लोकांनी तिचे वारेमाप कौतुक केले. तिची व ईशानची आॅनस्क्रीन केमिस्ट्रीही लोकांना प्रचंड भावली. तर याच ‘धडक’बद्दल आमच्याकडे ताजी बातमी आहे. ती म्हणजे या चित्रपटातील स्टारकास्टच्या मानधनाबद्दलची. होय, या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सर्वात आधी आपण जाणून घेऊ यात, ईशान खट्टरच्या मानधनाबद्दल. या चित्रपटात तो लीड रोलमध्ये आहे. ‘धडक’ हा ईशानचा दुसरा सिनेमा आहे. या चित्रपटासाठी ईशानला ६० लाख रूपये मानधन मिळाल्याचे कळतेय.
श्रीदेवींची लेक जान्हवी कपूर हिच्याबद्दल सांगायचे तर तिचा हा डेब्यू सिनेमा आहे. तिलाही या चित्रपटासाठी ६० लाख रूपये मानधन दिल्या गेल्याचे बोलले जातेय.
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा हाही या चित्रपटात आहे. त्याने यात जान्हवीच्या पित्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याला लीड अ‍ॅक्टर व लीड अ‍ॅक्ट्रेसपेक्षा अधिक म्हणजे ८० लाख मिळाल्याचे समजतेय.
अजय- अतुल या संगीतकारांना आज कोण ओळखत नाही. याच जोडीने ‘सैराट’ या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटाला संगीत दिले होते. त्यांनी ‘धडक’लाही संगीत दिले आहे. यासाठी या जोडीला १.५ कोटी रूपये मिळाले आहेत.
‘धडक’ हा ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे. त्यामुळे ‘सैराट’ची कथा लिहिणारे आणि तो दिग्दर्शित करणारे नागराज मंजुळे यांनाही हिस्सा दिला गेला आहे. त्यांना या रिमेकसाठी २ कोटी मिळाल्याचे बोलले जात आहे.
‘धडक’ दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक शशांक खेतान यांना या चित्रपटासाठी ४ कोटी मिळाले आहेत.

ALSO READ : पाहा, जान्हवी कपूरच्या रूपातील ‘आर्ची’ आणि ईशान खट्टरच्या रूपातील ‘परश्या’, ‘धडक’चा ट्रेलर रिलीज!!
 
Web Title: How many celebrities do the 'Dhad' artist get? Read the news if you want to know !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.