How did the name of 'Bhai' Salman Khan fall? | ​कसे पडले सलमान खानचे ‘भाई’ हे नाव?

सुपरस्टार सलमान खानला इंडस्ट्रीने अनेक नावे दिली आहेत. कुणी त्याला ‘दबंग खान’ म्हणत, कुणी ‘चुलबुल पांडे’ या नावानेही तो ओळखला जातो. पण एक नाव सगळ्यात लोकप्रीय आहे. ते म्हणजे, ‘भाई’. होय, सलमानला केवळ त्याचे चाहतेचं नाही तर इंडस्ट्रीतील तमाम लोक भाई या नावानेचं बोलवतात. सलमानला हे नाव कसे पडले, हे तुम्हाला ठाऊक आहे? अलीकडे सलमानने एका मुलाखतीत याचा खुलासा केला. सलमानचे मानाल तर लोकांच्या तोंडून स्वत:साठी ‘भाई’ ऐकणे फार रूचत नाही.  ‘भाई’ ऐकणे त्याला बरेच निगेटीव्ह वाटते. हे नाव ऐकल्यावर सलमानला तो जणू कुणी ‘दबंग’ व्यक्ती असावा, असे वाटते. पण मुळात हे नाव सलमानला चिकटलेचं कसे?
याबद्दल सलमानने सांगितले की, सोहेल खान मला ‘भाई’ म्हणून बोलवायचा. मग त्याचे मित्रही मला याच नावाने बोलवायला लागले. हळूहळू इतर लोकांनीही मला ‘भाई’ म्हणून संबोधणे सुरू केले. सलमानचे सल्लू झाले, सल्लूचे सल्ले, मग सलमान भाई आणि नंतर भाई...ही खूप लांब स्टोरी आहे, असेही सलमान म्हणाला.
लवकर सलमानचा ‘रेस3’ रिलीज होतोय. ‘टायगर जिंदा है’च्या जरबदस्त यशानंतर रेस-३’मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूड सुपरस्टार सलमानचा अ‍ॅक्शन अंदाज बघावयास मिळणार आहे.  ‘रेस-३’मध्ये सलमान, जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम बघावयास मिळणार आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

ALSO READ : ​सलमान खान का घेत नाही एकही सुट्टी? जाणून घ्यायचे तर वाचा बातमी!!
Web Title: How did the name of 'Bhai' Salman Khan fall?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.