How can I tell Rajkumar Rao's 'Newton', a copy of 'Irani' movie? | ‘या’ इराणी चित्रपटाचा कॉपी आहे राजकुमार रावचा ‘न्यूटन’, सांगा कसा मिळेल आॅस्कर?

भारताकडून आॅस्करसाठी पाठविण्यात आलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाविषयी आम्ही एक धक्कादायक आणि तेवढीच महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. होय, शुक्रवारी रिलीज झालेला ‘न्यूटन’ हा चित्रपट नक्षलग्रस्त भागात होणाºया मतदानाच्या मुद्द्यावर आधारित आहे. मात्र अशाच काहीशा कथेशी साम्य साधणाºया एका चित्रपटाची यापूर्वीच निर्मिती केली गेल्याचा दावा केल्याने, चित्रपटाच्या आॅस्कर शयर्तीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. होय, असे म्हटले जात आहे की, राजकुमार राव याची मुख्य भूमिका असलेल्या ‘न्यूटन’ची कथा इराणी ‘सीक्रेट बॅलेट’ या चित्रपटाच्या कथेवरून प्रेरित आहे. आता चित्रपटाच्या कंटेंटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने, भारताकडून आॅस्करसाठी करण्यात आलेल्या दावेदारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, इराणी ‘सीक्रेट बॅलेट’ या चित्रपटाला बाबाक पयामी नेने यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता. वास्तविक दोन्ही चित्रपटांची कथा एकाच मुद्द्यावर आधारित आहे. दोन्ही चित्रपटांत नक्षलग्रस्त भागात निवडणुका घेताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे दाखविण्यात आले आहे. दोन्ही चित्रपटांत एका सरकारी कर्मचाºयाची महत्त्वाची भूमिका दाखविण्यात आली आहे. दोन्ही चित्रपटांत दुसरी महत्त्वाची भूमिका एका सुरक्षा अधिकाºयाची आहे. जो पावलोपावली सरकारी कर्मचाºयाला निवडणुका न घेण्याबाबत सांगत असतो. अमित मसूरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ‘न्यूटन’मध्ये राजकुमार रावने एका पोलिंग एजंटची भूमिका साकारली आहे. जो छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात निवडणूक घेतो. त्याला विमानाने एका दुरग्रस्त भागात पोहोचविले जाते, ज्याठिकाणी त्याची भेट आत्मा सिंग म्हणजेच पंकज त्रिपाठीशी होते. चित्रपटात पंकज त्रिपाठी याला एका सुरक्षा अधिकाºयाच्या भूमिकेत दाखविण्यात आले आहे. जो निवडणुका कशा घ्याव्यात याविषयी चांगल्या पद्धतीने जाणून असतो. 

बाबक पयामी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सीक्रेट बॅलेट’मध्ये एक महिला नसीम अबिदी मुख्य भूमिकेत दाखविण्यात आली आहे. राजकुमार रावप्रमाणेच तीदेखील निवडणुकीसाठी एका दूरग्रस्त भागात जात असते. पंकज त्रिपाठीप्रमाणेच महिला निवडणूक अधिकारी नसीमसोबत एक सुरक्षा अधिकारी दाखविण्यात आला आहे. रिपोटर््सनुसार दावा करण्यात आला की, या दोन्ही चित्रपटांची केवळ थीमचसारखी नाही तर त्यातील बरेचसे सीन आणि डायलॉगही सारखे आहेत. राजकुमार रावप्रमाणेच इराणी चित्रपटातील नसीम अबिदीदेखील बॅलेट बॉक्स घेऊन फिरत असते. याप्रकरणी एनडीटीव्हीशी बोलताना ‘न्यूटन’चे दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी म्हटले की, ‘न्यूटन कोणत्याही चित्रपटापासून प्रेरित नाही, शिवाय रिमेकही नाही. चित्रपटाची कथा लिहिल्यानंतर मला माझ्या एका मित्राने ‘सीक्रेट बॅलेट’विषयी सांगितले होते. मी यू-ट्यूबवर इराणी चित्रपटाचे काही भाग बघितले. त्यामुळे मला असे वाटते की, तो चित्रपट माझ्या चित्रपटापेक्षा खूप वेगळा आहे. त्यामध्ये एक महिला पोलिंग अधिकारी दाखविण्यात आली आहे. इराणी चित्रपटात एक रोमॅण्टिक अ‍ॅँगलदेखील आहे. मात्र ‘न्यूटन’मध्ये असे काहीही दाखविण्यात आले नाही. 

पुढे बोलताना मसूरकर यांनी म्हटले की, ‘मला हे अगोदरच माहिती होते की, लोक दोन्ही चित्रपटांतील साम्यपणावर चर्चा करतील. त्यामुळे मी यावर काहीही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही लिखाण करता तेव्हा तुम्हाला हे माहीत नसते की, यावर अगोदरच लिखाण झाले आहे.’ दरम्यान, इराणी चित्रपट ‘सीक्रेट बॅलेट’ २००१ मध्ये रिलीज करण्यात आला होता. या चित्रपट जगभरातील अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आला आहे. शिवाय चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. 
Web Title: How can I tell Rajkumar Rao's 'Newton', a copy of 'Irani' movie?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.