फिट राहण्यासाठी तासंतास घाम गाळतात ‘हे’ स्टार्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 02:37 PM2019-04-25T14:37:37+5:302019-04-25T14:42:13+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या जेवढेही अ‍ॅक्टर्स आहेत ते सर्व आपल्या फिटनेससाठी नेहमी जागरुक आहेत. जवळपास सर्वच स्टार्स यासाठी जिम जात असतात. स्टार्सचे जिम जाण्या-येण्याचे फोटो तसे सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतच असतात. मात्र यांपैकी असेही काही स्टार्स आहेत जे फिट राहण्यासाठी अन्य स्टार्सपेक्षा जास्त घाम गाळतात, आज आपण अशाच काही स्टार्सविषयी जाणून घेऊया...

How Bollywood celebs stay fit | फिट राहण्यासाठी तासंतास घाम गाळतात ‘हे’ स्टार्स!

फिट राहण्यासाठी तासंतास घाम गाळतात ‘हे’ स्टार्स!

googlenewsNext

-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये सध्या जेवढेही अ‍ॅक्टर्स आहेत ते सर्व आपल्या फिटनेससाठी नेहमी जागरुक आहेत. जवळपास सर्वच स्टार्स यासाठी जिम जात असतात. स्टार्सचे जिम जाण्या-येण्याचे फोटो तसे सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतच असतात. मात्र यांपैकी असेही काही स्टार्स आहेत जे फिट राहण्यासाठी अन्य स्टार्सपेक्षा जास्त घाम गाळतात, आज आपण अशाच काही स्टार्सविषयी जाणून घेऊया...

* सलमान खान


५३ वय झालेल्या सलमान खानच्या फिटनेसचा या वयातही तोड नाही आहे. यासाठी तो खूपच मेहनतही करत असतो. त्याला इंडस्ट्रीमध्ये फिटनेसचा गुरुदेखील म्हटले जाते. तो पहिला असा अ‍ॅक्टर आहे, ज्याने शानदार बॉडी कल्चरला बॉलिवूडमध्ये आणले. आपले फिटनेस कायम ठेवण्यासाठी सलमान कार्डियोवेस्कुलर एक्घ्झरसाइज आणि वर्कआउट नियमित करतो आणि यासाठी तो दिवसाच्या व्यस्त शेड्युलमधून किमान दोन ते तीन तास आवर्जुन वेळ काढतो.

* टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ फिट राहण्यासाठी एक्झरसाइज, हेल्दी डायट तर फॉलो करतोच, सोबतच तो वाईट सवयींपासूनही दूर राहतो. टायगर ना मद्यपान करतो आणि नाही सिगारेट ओढतो. जिममध्ये घाम गाळण्याबरोबरच टायगर आपल्या डायटवरही परिपूर्ण लक्ष देतो. तो आहारात दररोज आठ अंड्यांसोबत चिकन आणि फिश घेत असतो. टायगरने जिममध्ये विकली एक्झरसाइज प्लॅन तयार केला आहे. तो प्रत्येक दिवशी वेगवेगळा एक्झरसाइज करत असतो.

* रणवीर सिंह


रणवीर सिंह सकाळी सर्वात अगोदर उठून काय खाणार हे त्याचा डायटिशियन नव्हे तर चित्रपटातील त्याची भूमिका डिसाइड करते. तो आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी वेगळा डायट प्लॅन फॉलो करतो. आणि तो यासाठी नेहमी सतर्क राहत असतो. पुश अप, बरपीज, डेडलिफ्ट, स्क्वॉट यांसारखे एक्झरसाइज तो करणे पसंत करतो. जवळपास एक ते दोन तास तो या एक्झरसाइजसाठी प्रत्येक दुसऱ्या दिवशी देत असतो. तो रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग करण्यावरही विश्वास ठेवतो. एक्झरसाइज सुरु करण्याअगोदर तो १० मिनिटे वॉर्म अप करतो. याशिवाय तो कार्डिया आणि अ‍ॅब्सशी संबंधीत बरेच एक्झरसाइज करतो.

* अक्षय कुमार
५१ व्या वयातही अक्षय कुमारचे फिटनेस जबरदस्त आहे. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अक्षय पार्ट्या आणि अल्कोहोलपासून दूर राहण्यासाठी ओळखला जातो. तो रोज सकाळी ४.३० वाजता उठतो आणि रात्री ९ वाजेपर्यंत झोपून जातो. नाइट शिफ्ट तो सहसा अवॉइड करतो. आपल्या स्टॅमिना वाढविण्यासाठी आठवड्यातून दोन ते तिनदा बास्केटबॉल खेळतो. वेळ मिळाल्यावर तो मुलासोबत स्विमिंग करतो. आपले फिटनेस टिकविण्यासाठी तो नऊ नियमांचे कित्येक वर्षांपासून पालन करत आहे.

* ऋतिक रोशन


बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन लुक्सशिवाय आपल्या बॉडीसाठीदेखील खूप फेमस आहे. त्याच्या फिटनेसचे लाखो फॅन्स आहेत. ऋतिक फिट राहण्यासाठी खूपच मेहनतही करतो. यासाठी तो एक्झरसाइज पासून ते डायटिंग पर्यंत संपूर्ण काळजी घेत असतो. ऋतिक आठवड्यातून फक्त चार-पाचच दिवस एक्झरसाइज करतो. या दरम्यान ऋतिक कार्डियो एक्झरसाइजवर लक्ष देत असतो. याशिवाय ऋतिक सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा एक्झरसाइज करतो.

* जॉन अब्राहम
जॉन अब्राहम बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि हेल्दी स्टार्सपैकी एक आहे. मॉडलिंग आणि अ‍ॅडव्हर्टाइजमेंटच्या जगात नाव कमविल्यानंतर २००३ मध्ये आलेला ‘जिस्म’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा जॉन आपल्या डॅशिंग आणि सुपर फिट बॉडीसाठी ओळखला जातो. त्याच्यामते, हेल्थ आणि वर्कआउटपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट कोणतीही नाही. तो आपल्या बॉडीलाच सर्वकाही मानतो.

Web Title: How Bollywood celebs stay fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.