आलिया भटने केल्या लाखो विनवण्या , तेव्हा कुठे मिळाला राजमौलींचा हा सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 12:26 PM2019-04-22T12:26:42+5:302019-04-22T12:27:42+5:30

‘आरआरआर’ या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, आलियाला राजमौलींचा ‘आरआरआर’ कसा मिळाला, यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.

how alia bhatt gets chance to work with ss rajamouli in rrr | आलिया भटने केल्या लाखो विनवण्या , तेव्हा कुठे मिळाला राजमौलींचा हा सिनेमा!

आलिया भटने केल्या लाखो विनवण्या , तेव्हा कुठे मिळाला राजमौलींचा हा सिनेमा!

googlenewsNext
ठळक मुद्देराजमौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाकडे सध्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. तेलगूशिवाय हिंदीतही हा चित्रपट रिलीज होणार आहे.

बॉलिवूडची नव्या पिढीची सुपरस्टार आलिया भट सध्या जोरात आहे. एकापेक्षा एक दमदार प्रोजेक्ट तिच्याकडे आहेत. आलियाचा अभिनय पाहून अनेक मोठे प्रोजेक्ट तिला आॅफर होत आहेत. एकीकडे संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’मध्ये ती लीड रोलमध्ये आहे. तर दुसरीकडे ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. याच ‘आरआरआर’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय, आलियाला राजमौलींचा ‘आरआरआर’ कसा मिळाला, यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.




होय, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या चित्रपटासाठी आलियाने स्वत: राजमौलींकडे मानमान मिनत्या केल्या. तेव्हा कुठे तिला हा चित्रपट मिळाला. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द आलियाने याचा खुलासा केला. ‘राजमौली सर मला एअरपोर्टवर भेटले होते. त्यांना पाहून मी अक्षरश: आनंदाने नाचायला लागले. मला तुमच्या चित्रपटात काम द्या. तुमच्या चित्रपटात जी काही भूमिका असेल, ती मी करेल, असे मी त्यांना म्हणाले. तोपर्यंत राजमौली यांनी ‘आरआरआर’मध्ये कुणालाही कास्ट केले नव्हते. राजमौली सरांनी एकक्षण विचार केला आणि मला माझ्या डेट्सबद्दल विचारले. तुम्ही त्याची चिंता करू नका. मला वेळ सांगा, मी माझे शेड्यूल मॅनेज करेल, असे मी त्यावर म्हणाले. यानंतर काही दिवसांनी राजमौली यांनी मला ‘आरआरआर’ची आॅफर दिली. त्यांचा फोन आला तेव्हा माझा आनंद अक्षरश: ओसंडून वाहत होता. मी त्यांची आॅफर स्वीकारली आणि माझ्या डेट्सही अ‍ॅडजस्ट केल्यात,’ असे आलियाने यावेळी सांगितले.




राजमौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाकडे सध्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. तेलगूशिवाय हिंदीतही हा चित्रपट रिलीज होणार आहे. साऊथ सुपरस्टार रामचरण तेजा आणि ज्युनिअर एनटीआर यात लीड रोलमध्ये आहेत. अजय देवगणही यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पुढील वर्षी ३०जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: how alia bhatt gets chance to work with ss rajamouli in rrr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.