'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण झाले पूर्ण, लवकरच येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 07:37 PM2018-11-21T19:37:43+5:302018-11-21T19:38:50+5:30

'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून या चित्रपटातील कलाकारांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

'Housefull 4' shooting completed, soon to release | 'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण झाले पूर्ण, लवकरच येणार भेटीला

'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण झाले पूर्ण, लवकरच येणार भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्दे'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित

'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून या चित्रपटातील कलाकारांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति खरबंदा आणि चंकी पांडे हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

अभिनेता अक्षय कुमारने ट्विटरवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. फोटो शेअर करीत त्याने लिहिले, 'आम्ही 'हाऊसफुल ४'चे शूटींग संपवले आहे. 'हाऊसफुल ४' ची गंमत संपतच नाही. आपल्याला भेटू २०१९ मध्ये.'




तर अभिनेत्री कृती सेनन हिनेदेखील फोटो शेअर करीत ट्विट केले की,'मजेदार, वेड्यासारखा प्रवास पूर्ण झाला. 'हाऊसफुल ४' चे चित्रीकरण संपले.'




'हाऊसफुल ४'च्या सीक्वलला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. नाना पाटेकरवर तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर नानाला या चित्रपटातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानवरदेखील लैंगिक शोषणाचे आरोप झाले. त्यालाही चित्रपटातून डच्चू देण्यात आला.  अभिनेता नानाच्या ऐवजी राणा दुग्गाबत्ती आणि साजिद खानच्या जागी दिग्दर्शक फरहाद समजी यांची वर्णी लागली. अशा अनेक अडथळ्यांचा सामना करीत या चित्रपटाचे शूटींग अखेर पार पडले आहे. 
'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याचबरोबर बॉबी या कॉमेडी सिक्वेंसमध्ये कितपत परफेक्ट बसेल हे बघणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: 'Housefull 4' shooting completed, soon to release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.