जिथे- तिथे शाहरुख...!  शशी थरूर यांनी केले ट्वीट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 03:45 PM2019-01-22T15:45:18+5:302019-01-22T15:47:03+5:30

केरळच्या चाहत्यांनी थेट हॉटेलच्या एका रूममध्ये शाहरूखचे ‘मंदिर’ थाटले. होय, सहजी विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. खुद्द काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

A hotel in Munnar has a shrine dedicated to SRK, Shashi Tharoor tweets | जिथे- तिथे शाहरुख...!  शशी थरूर यांनी केले ट्वीट!!

जिथे- तिथे शाहरुख...!  शशी थरूर यांनी केले ट्वीट!!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास शशी थरूर यांचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होतेय. या ट्वीटमधील एका फोटोत शशी थरूर शाहरूखच्या एका कट्आऊटसोबत पोज देतानाही दिसत आहेत.

शाहरूख खान चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. इतक्या वर्षांनंतरही शाहरूखची क्रेज जराही कमी झालेली नाही. याचमुळे शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी लोक आतूर होतात. त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर तासन् तास ताटकळत उभे राहतात. इतके कमी की काय म्हणून केरळच्या चाहत्यांनी याहीपुढे जात  थेट हॉटेलच्या एका रूममध्ये शाहरूखचे ‘मंदिर’ थाटले. होय, तुम्हाला सहजी विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. खुद्द काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
अलीकडे शशी थरूर केरळच्या दौ-यावर गेले होते. यादरम्यान मुन्नार येथील एका हॉटेलात त्यांनी काही तास मुक्काम केला.  हॉटेलच्या रूमममध्ये शशी थरूर पोहोचले आणि त्यांना धक्काच बसला. अख्ख्या रूममध्ये केवळ आणि केवळ शाहरूखचे फोटो आणि कटआऊट्स होते. रूमची प्रत्येक भींत शाहरूखच्या फोटोंनी सजवण्यात आली होती. इतकी की, आराम करायलाही जागा मिळेना.




शशी थरूर यांनी हा ‘नजारा’ बघितला आणि ट्वीटरवर रूमचे फोटो शेअर केलेत. केवळ इतकेच नाही तर शाहरुखच्या नावे त्यांनी एक पोस्टही लिहिली. ‘डिअर शाहरूख केरळच्या मुन्नारमध्ये गेलो असता मी एका हॉटेलची रूम बुक केली.  २०१३ मध्ये ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या शूटींगदरम्यान तू हॉटेलच्या याच रूममध्ये मुक्कामास होता. तू गेल्यानंतर ही रूम एका ‘मंदिरात’ परिवर्तीत झाली आहे. खोलीची प्रत्येक भींत तुझ्या पोस्टर्सनी सजवली गेली आहे. अख्ख्या खोलीत तुझेच कट्आऊट्स आहेत. आराम करायलाही जागा नाही....,’असे शशी थरूर यांनी शाहरूखला टॅग करत लिहिले.
तूर्तास शशी थरूर यांचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होतेय. या ट्वीटमधील एका फोटोत शशी थरूर शाहरूखच्या एका कट्आऊटसोबत पोज देतानाही दिसत आहेत.

Web Title: A hotel in Munnar has a shrine dedicated to SRK, Shashi Tharoor tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.