बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने तिच्या लूक्स, फॅशन, स्टेटमेंट आणि अफेअरमुळे चर्चेत असते. सध्या दिशा तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ याच्यासोबत ‘बागी-२’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अशात तिने तिचे लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर करीत चाहत्यांना एकप्रकारचे गिफ्ट दिले आहे. या फोटोशूटमध्ये दिशा खूपच हॉट दिसत आहे. परंतु काही युजर्सना दिशाचा हा अंदाज फारसा भावला नसल्याने त्यांनी तिच्या या फोटोंवर चांगलीच सडकून टीका केली आहे. दिशा या फोटोवरून ट्रोल होत असून, युजर्सनी तिला विविध सल्ले दिले आहेत. 



मॅक्झिम इंडियाच्या कव्हर पेजसाठी दिशाने पांढºया रंगाच्या आउटफिटमध्ये अतिशय बोल्ड असे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये दिशा खूपच आकर्षक दिसत आहे. दिशाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना त्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. दिशा नेहमीच तिच्या हॉट फोटोंवरून ट्रोल होत असते. यावेळेसदेखील दिशा तिच्या चाहत्यांच्या रडारवर आली. काही युजर्सनी तर चक्क तिला साडी घालण्याचा सल्ला दिला आहे. एका युजर्सने तिला सल्ला देताना म्हटले की, पूर्ण कपडे घातल्यास तुझे सौंदर्य आणखी खुलून दिसेल.




दिशा पाटनीने आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु तिची लोकप्रियता प्रचंड असून, चाहत्यांची संख्या वाढण्याचे प्रमाण सुरूच आहे. दिशाने हॉलिवूड सुपरस्टार जॅकी चॅन यांच्यासोबत ‘कुंग फू योगा’ आणि सुशांतसिंग राजपूतसोबत एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये काम केले. दिशा टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड असून, सध्या ती त्याच्यासोबत ‘बागी-२’मध्ये काम करीत आहे. त्याचबरोबर दिशाने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली की, ती तामिळमधील ऐतिहासिक ‘संघमित्रा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी अगोदर श्रुती हासन हिच्या नावाचा विचार करण्यात आला होता. 
Web Title: Hot Photo Sharing Direction Patlila Trolorsan Said Said to Inspire Saadi, See Photo!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.