Horror Comedy : ‘स्त्री’ पाहिला; आता घाबरवणार ‘रूह अफ्जा’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:39 AM2019-02-27T11:39:52+5:302019-02-27T11:39:59+5:30

‘स्त्री’च्या या अनपेक्षित यशानंतर निर्माता दिनेश विजन व अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा एक नवा कोरा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येणार आहेत.

Horror Comedy: rajkummar raos horror comedy with producer dinesh vijan rooh-afza | Horror Comedy : ‘स्त्री’ पाहिला; आता घाबरवणार ‘रूह अफ्जा’!!

Horror Comedy : ‘स्त्री’ पाहिला; आता घाबरवणार ‘रूह अफ्जा’!!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास राजकुमार राव अनेक चित्रपटात बिझी आहे. मेड इन चायना, मेंटल है क्या  या चित्रपटांत राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

गतवर्षी आलेल्या ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने अनपेक्षितपणे यश मिळवले. सगळे अंदाज खोटे ठरवत, हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ‘स्त्री’च्या या अनपेक्षित यशानंतर निर्माता दिनेश विजन व अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा एक नवा कोरा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती, पण चित्रपटाचे नाव ठरलेले नव्हते. पण आता या चित्रपटाच्या नावाचीही घोषणा झालीय. या चित्रपटाचे नाव इतके वेगळे आहे की, ते ऐकल्यानंतर तुम्हाला कडक उन्हाळा तापल्याचा भास होईल. होय, राजकुमार राव स्टारर या हॉरर चित्रपटाचे नाव असणार आहे, ‘रूह अफ्जा’. आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. आजच या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली.


‘स्त्री’ प्रमाणेच ‘रूह अफ्जा’ हाही एक भयपट आहे. म्हणजे, या चित्रपटातूनही राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवताना दिसणार आहे. अर्थात सोबत विनोदाचा तडका असणार आहे. यासाठी निर्मात्यांनी एका दिग्गज कॉमेडी स्टारलाही या चित्रपटात कास्ट केले आहे. या कॉमेडी स्टारचे नाव आहे, वरूण शर्मा. होय, राजकुमार रावसोबत ‘फुकरे’ फेम वरूण शर्मा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. राजकुमारच्या अपोझिट कोणती हिरोईन दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याचीही घोषणा होईल, असे कळतेय. ‘रूह अफ्जा’ या चित्रपटात उत्तर प्रदेशातील मुरादाबादची कथा दाखवण्यात येणार आहे.  
तूर्तास राजकुमार राव अनेक चित्रपटात बिझी आहे. मेड इन चायना, मेंटल है क्या  या चित्रपटांत राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: Horror Comedy: rajkummar raos horror comedy with producer dinesh vijan rooh-afza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.