'Hollywood' betrayed Rajinikanth! Legal actions taken by producers !! | ​‘हॉलिवूड’ने केली रजनीकांत यांची फसवणूक ! निर्माते करणार कायदेशीर कारवाई!!

साऊथचा मेगास्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकण्यात आली आहे. हा चित्रपट आधी जानेवारीत रिलीज होणार होता. पण आता चित्रपटाची रिलीज डेट एप्रिलपर्यंत लांबणीवर पडली आहे. निश्चितपणे प्रदर्शन लांबवणीवर पडल्यामुळे तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील निर्माते नाराज आहे. अनेक तेलगू निर्मात्यांनी उन्हाळ्याची सुट्टी डोळ्यांपुढे ठेवत  आपल्या चित्रपटाच्या रिलीजसाठी एप्रिलचा मुहूर्त राखून ठेवला होता. पण आता एप्रिलमध्ये ‘2.0’ रिलीज होणार म्हटल्यावर या निर्मात्यांना धडकी भरली आहे. ‘2.0’च्या निर्मात्यावर हे सगळे निर्माते नाराज आहेत आणि या सगळ्यामागे हॉलिवूड आहे. सूत्रांचे मानाल तर हॉलिवूडमुळे ‘2.0’चे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. होय,  ‘2.0’च्या व्हीएफएक्सचे काम अमेरिकन कंपन्यांना दिले गेले होते. या कंपन्यांना चित्रपटात स्पेशल इफेक्ट्स टाकायचे होते. या कंपन्यांना ९० टक्के पेमेंट करण्यात आले होते आणि आता खबर आहे की, या कंपन्यांचे दिवाळे निघाले आहे. सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेच्या १० कंपन्यांना १००० शॉट्स दिले गेले होते. प्रत्येक कंपनीला १०० शॉट्स यानुसार विभागणी करण्यात आली होती. पण या अमेरिकन कंपन्यांनी आमची फसवणूक केली. आता आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. कंपनीने वेळेवर आपले काम पूर्ण केले नाही. यामुळे आम्हाला चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली.

ALSO READ : ​रिलीजपूर्वीच ‘2.0’ची रेकॉर्ड कमाई!

‘2.0’ची रिलीज डेट दोन वेळा लांबणीवर टाकण्यात आली आहे. सर्वात आधी हा चित्रपट दिवाळीत येणार होता. पण हे मुहूर्त हुकले आणि चित्रपटासाठी जानेवारीचा नवा मुहूर्त ठरला. पण आता हा चित्रपट एप्रिलमध्ये येईल असे सांगण्यात येत आहे. ‘2.0’ हा चित्रपट २०१० मध्ये आलेल्या ‘रोबोट’ या सिनेमाचा  सीक्वल आहे. ‘2.0’मध्ये रजनीकांत एका वैज्ञानिकाच्या आणि रोबोटच्या दुहेरी भूमिकेत बघावयास मिळणार आहे.  अक्षयकुमारही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, तो यात खलनायक साकारत आहे. त्याचबरोबर एमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसेन यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 
Web Title: 'Hollywood' betrayed Rajinikanth! Legal actions taken by producers !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.