Hero of 'Aparthei' co-star 'Jivea Jeev'! | ​‘शिवाय’च्या हिरोईनचा ‘को-स्टार’वर जडला जीव!

अजय देवगणच्या ‘शिवाय’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाद्वारे दोन नवे चेहरे बॉलिवूड डेब्यू करताहेत. एक दिलीप कुमारची नात सायेशा सहगल आणि दुसरी ‘फॉरेन ब्युटी’ म्हणजेच  पोलंडची एरिका कार. एरिकाचा ‘शिवाय’ हा पहिलाच चित्रपट. यात ती अजयसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हीच एरिका प्रेमात पडलीय. तेही आपल्या को-स्टारच्या. होय, खुद्द एरिकानेच हा खुलासा केला. अर्थात हा को-स्टार म्हणजे अजय नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट करतो. एका मुलाखतीदरम्यान एरिकाने ती तिच्या को-स्टारला डेट करीत असल्याचे सांगितले. रॅपिड-फायर सेशनदरम्यान तिला एक प्रश्न विचारण्यात आला. तु कधी तुझ्या को-स्टारला डेट केले आहेस का? असा हा प्रश्न होता. या प्रश्नावर एरिका चांगलीच लाजली. ‘हे देवा, मला माफ कर. मी माझ्या को-स्टारशी डेट करतेय,’असे ती म्हणाली. अर्थात हा को-स्टार कोण? हे मात्र तिने सांगितले नाही. कारण हा को-स्टार ‘शिवाय’शी संबंधित आहे. त्यामुळे तिने यावर बोलणे टाळले. पण एका बातमीनुसार, एरिका म्हणतेय, ते खरे आहे. एरिका ‘शिवाय’च्याच एका को-स्टारला डेट करतेय. या चित्रपटात त्याची लहानशी भूमिका आहे. खरे तर ‘शिवाय’ हा एरिकाचा पहिला चित्रपट आहे आणि या पहिल्याच चित्रपटात तिला तिचे प्रेम मिळालेय.  


Web Title: Hero of 'Aparthei' co-star 'Jivea Jeev'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.