अभिनेत्री कंगना राणौतसोबतच्या कथित अफेअरच्या चर्चेवर हृतिक रोशनने पहिल्यांदा आपले तोंड उघडले आहे. काल हृतिकने अडीच पानाचे स्टेटमेंट जारी करून कंगनाचे सगळे आरोप फेटाळून लावले. मी कंगनाला कधीच खासगीत भेटलेलो नाही. ती असा दावा करत असेल तर ते खोटे आहे. तिच्या व माझ्या अफेअरचे पुरावे म्हणून जे फोटो दाखवले जात आहेत, ते सगळे फोटोशॉप्ड आहेत, असे हृतिकने या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. 
हृतिकच्या या स्टेटमेंटवर कंगना अद्याप काही बोललेली नाही. पण कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने मात्र यावरून हृतिकवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. केवळ हल्लाच नाही तर तिने हृतिकने कंगनाला पाठवलेला एक कथित ई-मेल सार्वजनिक केला आहे. ‘तू आणि मी सर्वसामान्य कपल्ससारखे नसूनआपले आयुष्य त्यांच्यापेक्षा वेगळे आहे,’असे हृतिकने कथितरित्या या मेलमध्ये म्हटले आहे.‘तुझ्या ई-मेल्सचा पूर पाहिला. मी तुला अजिबात दोष देणार नाही. मी थोडा बिझी होतो. त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. आपले आयुष्य इतर कपल्सपेक्षा वेगळे आहे. काश, असे नसते. पण हेच वास्तव आहे. मी यातून बाहेर पडू शकेल, यासाठी माझी सोबत दे. जेणेकरून आपण एक नवी सुरुवात करू शकू, नव्या आठवणी निर्माण करू शकू. तुझा तो व्हिडिओ पाहिला. फारच टीजिंग होता. मला आणखी बघायचे होते. पण काही बोललो नाही. कारण तुझी प्रकृती ठीक नव्हती,’ असे या मेलमध्ये म्हटले आहे.
या ईमेलचा स्क्रिनशॉट रंगोलीने शेअर केला आहे.‘ हा स्क्रिनशॉट कुठलेही गॉसिप्स उभे करण्यासाठी नाही. हे ईमेल्स लॅपटॉपवरून नाही तर आयपॅडवरून लिहलेआहेत, हे मला सांगायचेय. हृतिकने आपला लॅपटॉप फॉरेन्सिक इनव्हेस्टिगेशनसाठी दिलाय. आयपॅड दिलेला नाही. विचार करा का? ’असे टिष्ट्वट रंगोलीने केले आहे. पुढचा वार करताना रंगोलीने कंगना व हृतिकचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ‘कंगनाने फोटोशॉप्ड फोटो पब्लिक केला,असा तुझा आरोपआहे. तू याच फोटोबद्दल बोलत असशील तर तो कुणी रिलीज केला, ठाऊक नाही.
ALSO READ : अखेर हृतिक रोशन बोलला! कंगना राणौतच्या आरोपांना दिले ‘आॅफिशिअल’ उत्तर!!

पण फोटोशॉप्डचा काय अर्थ आहे? कंगनाच्या कमरेत हात टाकून उभा असलेला तू नाहीस का? तू तिच्या कमरेत हात घालून तिचा कवटाळले आहेस. याऊलट कंगना अजिबात इंटरेस्टेड दिसत नाहीय,’ असे रंगोलीने लिहिले आहे.
एकंदर काय तर हृतिक व कंगनाचीलढाईआता वेगळ्याच स्तराला पोहोचले आहे. आता पुढे काय होते, ते बघूच.
Web Title: Here's a screenshot of Hrithik Roshan's email sent to Kangna Ranaut! Rangoli rehearsed !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.