बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा हिने तिचे कुठलेही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले की ते चर्चेचा विषय बनतात. विशेष म्हणजे, त्यातील बहुतांश फोटोंमुळे ती ट्रोल होत असते. आता पुन्हा एकदा मलाइका तिच्या शॉर्ट ड्रेसवरील फोटोमुळे ट्रोल होत आहे. त्याचे झाले असे की, मलाइकाने तिच्या घरी प्री-ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत निर्माता करण जोहर, करिना कपूर-खान, करिश्मा कपूर यांच्यासह तिची गर्ल गॅँग उपस्थित होती. या सगळ्यांनी पार्टीत खूप धमाल केली. त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केले. मात्र तिचे हे फोटो युजर्सला फारसे भावले नसावेत, म्हणूनच त्यांनी सलमान खानची वहिनी राहिलेल्या मलाइकाचा चांगलाच समाचार घेतला. मलाइकाची मैत्रीण सीमा खान हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पार्टीतील काही फोटो पोस्ट केले. या फोटोमध्ये मलाइकाने डार्क पर्पल कलरचा शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. हा शॉर्ट ड्रेस घालून ती सोफ्यावर करण जोहर आणि तिच्या मैत्रिणीसोबत बसलेली दिसत आहे. मलाइकाच्या आजूबाजूला करिना आणि करिश्माही दिसत आहेत. परंतु युजर्सनी या सर्वांना बाजूला सारत मलाइकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. युजर्सनी लिहिले की, ‘तुला व्यवस्थित कपडे परिधान करायला हवे होते. स्वत:च्या वयाच्या विचार करता तू तुझे संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे परिधान करायला हवेत. एका युजर्सने लिहिले की, ‘मलाइका तिच्या बहुतांश फोटोंमध्ये एक तर नशेत दिसते नाही तर नग्न अवस्थेत दिसत असते, तर एका युजर्सने मलाइका चीप असे म्हणत लिहिले की, तिचा कुठला क्लास नाही.खरं तर मलाइका पहिल्यांदाच युजर्सच्या निशाण्यावर आली असे नाही, तर यापूर्वीही तिच्या फोटोंवरून युजर्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे. परंतु मलाइका या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे तिने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. वास्तविक मलाइकाप्रमाणे बॉलिवूडमधील इतरही बरेचसे असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांना कपड्यांवरून युजर्सनी चांगले-वाईट सल्ले दिले आहेत. 
Web Title: With the help of a short dress, Karan Johar photographed a photo of Malaika Arrow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.