Haviyan Nawazuddin Siddiqui's help to launch child in 'Gadar' director Read what the matter is !! | ​‘गदर’च्या दिग्दर्शकाला मुलाला लॉन्च करण्यासाठी हवीयं नवाजुद्दीन सिद्दीकीची मदत! वाचा काय आहे मामला!!

‘गदर ’ आणि ‘अपने’ यासारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे अनिल शर्मा यांनी आता एक नवी तयारी चालवली आहे.ती म्हणजे, आपल्या मुलाला लॉन्च करण्याची. अर्थात यासाठी त्यांना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची मदत हवी आहे. आता ही काय भानगड आहे, हे तुम्हाला असे कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला अख्खी बातमी वाचायला हवी.एकेकाळी सपोर्टींग अ‍ॅक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये पाय रोवू पाहणाºया नवाजुद्दीनने आज एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाबुमोशाय बंदुकबाज’च्या यशनंतर नवाजने वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्याचा सल्ला दिला आहे. काही रोमन्टिक चित्रपट निवडण्याची गोष्टही त्याने केली होती. आता नवाजुद्दीनने अनिल शर्मा यांचा ‘जीनिअस’ हा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाद्वारे अनिल शर्मा आपला मुलगा उत्कर्ष याला लॉन्च करणार आहेत. म्हणजेच एकंदर काय तर नवाजुद्दीनच्या स्टारडमची मदत घेऊन उत्कर्षाच्या यशाचा पाया रचण्याचे अनिल शर्मा यांचे प्रयत्न आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. जानेवारी २०१८ पर्यंत हे शूटींग पूर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थात नवाजुद्दीन या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नेहमी वेगळ्या भूमिका साकारणारा नवाज यात कुठली भूमिका साकारतो आणि उत्कर्षच्या यशाचा पाया कसा रचून देतो, ते पाहणे त्यामुळे इंटरेस्टिंग ठरणार आहे. 

ALSO READ : बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईचे नाव

अलीकडे नवाजुद्दीन ‘मॉम’,‘मुन्ना मायकेल’,‘रईस’,‘हरामखोर’ अशा अनेक चित्रपटांत दिसला. प्रत्येक चित्रपटात त्याने हटके व्यक्तिरेखा साकारली. लवकरच नवाजुद्दीनचा ‘मंटो’ हा चित्रपट रिलीज होत आहे. केवळ इतकेच नाही तर विशाल भारद्वाजसोबत काम करण्याचे नवाजचे स्वप्नही येत्या काळात पूर्ण होणार आहे. विशाल भारद्वाज यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या एका कॉमेडी चित्रपटात नवाज लीड रोलमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘लंच बॉक्स’ फेम दिग्दर्शक रितेश बतरा यांचा एक चित्रपटही नवाजकडे आहे.  नवाजकडे चित्रपटांची रांग उगीच नाही. त्याच्या स्टारडमचा आश्रय घेतला जात आहे, हे उगीच नाही. नवाजने ते सिद्ध केले आहे. आता केवळ उत्कर्ष स्वत:ला कसा सिद्ध करतो ते बघायचेयं.
Web Title: Haviyan Nawazuddin Siddiqui's help to launch child in 'Gadar' director Read what the matter is !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.