गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूरच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. सोनम कपूर तिचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत लवकरच लग्न करणार, अशी जोरदार चर्चा  आहे. पण तूर्तास कपूर घराण्यात सोनमच्या नाही तर दुस-याच कुणाच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.  होय, बॉलिवूड अभिनेता आणि अनिल कपूर याचा भाचा (सोनमचा आतेभाऊ) मोहित मारवाह आज मंगळवारी बोहल्यावर चढणार आहे.  गर्लफ्रेन्ड अंतरा मोतीवालासोबत मोहित लग्नगाठ बांधणार आहे. अख्खे कपूर घराणे या लग्नासाठी दुबईत आहे. कालपासून लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. या डेस्टिनेशन वेडिंगचे काही फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.   

  अंतरा ही मारवाह कुटुंबाची सून होणार आहे. पण या अंतराचे अंबानी कुटुंबाशीही जवळचे नाते आहे. होय, अंतरा ही अनिल अंबानीची पत्नी आणि बॉलिवूडची एकेकाळची लोकप्रीय अभिनेत्री टीना अंबानीच्या बहिणीची मुलगी आहे. म्हणजेच टीना अंबानी अंतराची मावशी आहे.

ALSO READ : ​‘पॅडमॅन’नंतर सोनम कपूरने घेतलायं एक मोठा निर्णय! जाणून घ्या काय!!

मोहितने ‘रागदेश’ आणि ‘फुगली’ या चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय यशराज फिल्म्सच्या युथ डिव्हिजन वाय- फिल्म्सच्या ‘लव शॉट्स’ या शॉर्ट फिल्म्समध्येही तो दिसला आहे. तूर्तास दुबईच्या उल खेइमा एस्टोरिया हॉटेलमध्ये मोहित व अंतरा यांच्या लग्न सोहळ्याचे विधी सुरू आहेत. अर्जुन कपूर, बोनी कपूर,रिया कपूर, संजय कपूर, श्रीदेवी, जय कपूर, शनाया कपूर, मनीष मल्होत्रा, अथिया शेट्टी असे सगळे या लग्नात सहभागी झाले आहेत. सोनम कपूर, अनिल कपूर हे दोघेही वेळात वेळ काढून ऐनवेळी या लग्नाला पोहोचतील अशी शक्यता आहे. श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर तिच्या ‘धडक’ या सिनेमात बिझी असल्याने या लग्नात सहभागी होऊ शकलेली नाही.
मोहित व अंतरा दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही लग्न करणार, अशी चर्चा होती.
Web Title: Have you seen pictures of Sonam Kapoor's sister-in-law?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.