Haseena Parker's release finally found! | हसीना पारकरच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला !

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या आयुष्यावर आधारित चित्रपट हसीना पारकरची रिलीज टेड अखेर मुहूर्त सापडला  आहे. आता हा चित्रपट 22 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. याआधी ही या चित्रपटाची टेड दोनवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. अपूर्व लखियाने दिग्दर्शित या चित्रपटात हसीनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारत आहेत तर तिच्या भावाची भूमिका म्हणजेच दाऊदची व्यक्तिरेखा श्रद्धाचा खरा भाऊ सिद्धार्थ साकारतो आहे. तर हसीनचा नवरा इब्राहिम पारकरच्या भूमिकेत अंकुर भाटिया दिसणार आहे. हा चित्रपट आधी 18 ऑगस्टला रिलीज करण्यात येणार होता. मात्र त्यादिवशी आयुषमान खुराना आणि क्रिती सॅननचा बरेली की बर्फी चित्रपट रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवरील क्लॉशेस टाळण्यासाठी हसीनाची रिलीज टेड पुढे सरकवण्यात आली आहे.  

ALSO READ : Don't Miss : ​‘हसीना पारकर’चा ‘इंटेन्स’ ट्रेलर आऊट!!

चित्रपटाचा निर्माते या चित्रपटाला एक चांगल्या दिवशी रिलीज करु इच्छितात कारण याचित्रपटातील प्रत्येक दृष्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. अतिशय मेहनत आणि संशोधन करुन हा चित्रपट तयार करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी श्रद्धाने ही मेहनत घेतली आहे. हसीनाची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धाने 4 कोटींचे मानधन घेतल्याचे कळते आहे. हसीनाला 'आपा' या नावाने ओळखले जायचे. दाऊद देश सोडून पळून गेल्यावर तिनेच त्याचा बेकायदेशीर कारभार सांभाळला होता. ही भूमिका करणे श्रद्धसाठी एका चॅलेंजचं होते. पण तिने हे चॅलेंज स्वीकारले. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यानंतर श्रद्धा प्रभाससोबत साहोमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.      
Web Title: Haseena Parker's release finally found!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.