Haryana singer Harshitha Dahiya shot dead! | हरियाणातील गायिका हर्षिता दहिया हिची गोळ्या झाडून हत्या!

हरियाणातील प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा हर्षिता दहिया हिची मंगळवारी अज्ञात मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात केली. हर्षिताच्या हत्येने तिच्या चाहत्यांना हादरवून सोडले आहे. पण हर्षिताला आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती. हत्येच्या काही तास आधी हर्षिताने आपल्या पहिल्या फेसबुक लाईव्हमध्ये ‘मी धमक्यांना घाबरत नाही,’ असे म्हटले होते. यानंतर काही तासांतच तिची हत्या झाली. उण्यापुºया २२ वर्षांची हर्षिता काल संध्याकाळी एका कार्यक्रमानंतर घरी परतत असताना  फोर्ड फिगो गाडीमधून दोन अज्ञात हल्लेखोरांनी तिचा पाठलाग केला. चमराडा येथे एक कार्यक्रम करून हर्षिता परतत होती. यावेळी हर्षिता आपल्या तीन मित्रांसह गाडीतून प्रवास करत होती. पानिपत परिसरात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि तिच्या सहका-यांना गाडीतून बाहेर काढले. यानंतर गाडीच्या मागच्या सीटवर बसलेलल्या  बसलेल्या हर्षितावर हल्लेखोरांनी अगदी जवळून चार गोळ्या झाडल्या. तिच्या डोक्यात आणि मानेवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या गेल्या. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.हर्षिताच्या हत्येमागे दोन कारणे असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर हर्षिताने काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त टीप्पणी करणारा व्हिडिओ शेअर केला होता. याचवरून तिला धमकी दिली जात होती.काही दिवसांपूर्वी हर्षिताने तिच्या बहिणीच्या नव-यावर बलात्काराचे आरोप केले होते. याच आरोपामुळे सध्या तो तुरूंगात आहे. हर्षिताच्या आईचीही हत्या करण्यात आली होती. या दिशेनही पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
मूळची सोनीपतची असलेली हर्षिता दिल्लीत आपल्या मावशीच्या घरी राहायची.
Web Title: Haryana singer Harshitha Dahiya shot dead!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.