harshvardhan rane and kim sharma permanently broke up with each other | ‘खुल्लम खुल्ला’ फिरणाऱ्या हर्षवर्धन राणे- किम शर्माचे ब्रेकअप?
‘खुल्लम खुल्ला’ फिरणाऱ्या हर्षवर्धन राणे- किम शर्माचे ब्रेकअप?

ठळक मुद्दे‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते.

‘मोहब्बतें’ फेम किम शर्मा आयुष्यात आली नि अभिनेता हर्षवर्धन राणे अचानक चर्चेत आला. हर्षवर्धन व किम यांच्या प्रेमाची गाडी अशी काही सूसाट धावू लागली की, मुंबईच्या रस्त्यांवरच्या बाईक राईडपासून हॉलिडेपर्यंत प्रत्येकठिकाणी हे कपल एकत्र दिसू लागले. पण गेल्या काही दिवसांत अचानक हे कपल एकत्र दिसणे बंद झाले. या कपलचे सोशल मीडियावर झळकणारे फोटोही अचानक गायब झालेत. आधी लोकांना हा ‘प्रायव्हसी’चा मामला वाटला. पण मामला निघाला ब्रेकअपचा. होय, हर्षवर्धन व किम यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकू येऊ लागली. यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आणि या ब्रेकअपवरची चर्चा कानोकानी झाली.

हर्षवर्धन व किमच्या ब्रेकअपचे कारण काय, हे कळू शकले नाही. पण त्यांच्यातील वाढलेले अंतर बघता, दोघांमध्येही ‘आॅल इज नॉट वेल’ हे मात्र सगळ्यांना कळून चुकलेय. आता या बातमीत किती तथ्य आहे, हेही लवकरच कळेल.

‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. किम शर्मा बद्दल सांगायचे तर ती कधीच बॉलिवूडमधून बाद झाली आहे. मोहोब्बतें, नहले पे दहला, मनी है तो हनी है, कुडियों का है जमाना यांसारख्या चित्रपटांमध्ये किम झळकली आणि अचानक बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. अर्थात हर्षवर्धनसोबतच्या अफेअरमुळे ती पुन्हा चर्चेत आली होती.


Web Title: harshvardhan rane and kim sharma permanently broke up with each other
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.